महाराष्ट्र वेदभुमी

रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांचा कोलाड आंबेवाडीत गावागावतून प्रचार.

 


कोलाड (श्याम लोखंडे ) 

३२ रायगड-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विक्रमी मतांनी विजय होण्यासाठी  रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कोलाड आंबेवाडी विभागात येथील गावागावात जाऊन मतदार यांची थेट भेट घेत प्रचारात आघाडी घेत आहेत.रोहा तालुक्यांतून तसेच आंबेवाडी खांब जिल्हा परिषद मतदार गणातून लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एक संयमी, अभ्यासू व शांत स्वभावाचे नेतृत्व व एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला कणखर उमेदवार म्हणजे अनंत गीते म्हणून त्यांची ख्याती असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शेकाप,राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस,सह महाविकास आघाडीतील सामजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे गाव गावात जाऊन दौरे करीत असून मतदारांजवळ संपर्क करीत उमेदवार गिते यांची ताकद आधिक बळकट करत असताना दिसत आहेत...

राष्ट्रवादी अजित पवार गट, बीजेपी,शिवसेना शिंदे गट,आदी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी भयानक उष्णतेची लाट आहे तरी देखील त्याची तमा न बाळगता गद्दारी विरुद्धची हि लढाई जिंकण्यासाठी तसेच देशाचे संविधान वाचविण्यासाठी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीचे सर्वेसर्वा असलेले उमेदवार अनंत गीते यांच्या विजयासाठी यावेळी मतदारांशी गावोगावी प्रचार करत मतदार तसेच आबालवृद्ध यांची भेट घेत गद्दारी विरुद्ध आवाज उठवून आणि आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना शंभर टक्के मतदान करून निवडून देऊन भरघोस मतांनी निवडून देत लोकसभेत पाठविण्यासाठी ऐकटवले आहेत.रायगडच्या राजधानीत नावीन्य पूर्ण विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीत दर्शवित प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महायुतीकडून पुन्हा पंतप्रधान करायचे, असे सांगून लोकांची दिशाभूल करून संविधान बदलण्याचा मोठा डाव असल्याचं बोलले जात आहे.हे बहुजन मतदारराजा यांना  चांगलेच माहित पडलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शेकाप चे जयंता भाई पाटील, काँगेस तसेच महविकास आघाडीतील घटक पक्षांचे  नेते यांचे नेतृत्व खंबीर आहे.रायगड जिल्हा सह कोकणात महाविकास आघाडीच्या प्रचार सभा घेतल्याने वातावरण आघाडीचे झाले आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रचारासाठी उतरले आहेत. एकत्र एक दिलाने काम करीत असल्याचे चित्र या निवडणुकीत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. वाडी-वस्त्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,नेते शरचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, निवडणुक प्रचाराचे काम युद्ध पातळीवर करीत असून यावेळेस अनंत गीते यांचा प्रचंड मतांनी विजय सुनिश्चित असल्याचे प्रचार दरम्यान शेकाप चे नेते शिवराम महाबले आणि उबाठाचे शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post