वार्ताहर -नंदेश गायकर..
सध्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद घुमू लागले आहेत... रायगड जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार मा.सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे मा.अनंत गीते यांच्यात चुरशीची लढत होत आहे...गल्लीगल्ली नाक्या नाक्यावर एकच चर्चा रायगडात ऐकू येऊ लागली आहे...रायगडात मशाल पेटणार,सरकार बदलणार..तर काही जनता रायगडात फिर एक बार..मोदी सरकारचा नारा देत आहे...नक्की कोण येणार ..?या संभ्रमात जनता रायगड जिल्ह्यात पडली आहे....
काही जनता तटकरे साहेब हे आपले जवळचे आहेत तर अनंत गीते साहेब मतांपुरते आले आहेत निवडून गेल्यानंतर गायब होतात....अशी विवंचना जनतेच्या मनात आहे...जनतेचा कल हा दोन्ही बाजूंनी असला तरी रायगडातील जनता घराणेशाही वरून नाराजीचा सुर धरत आहे....जुनी जाणती मंडळी बाळासाहेबांना मानणारी मशाल पेटवणार अशी धारणा उराशी बाळगून आहे...तर तरूण होतकरू मंडळी तटकरे साहेब खासदार होणार असं स्वप्न उराशी बाळगून आहे...रायगड जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे...आता जनताच ठरवणार आपला खरा वारसदार कोण..योग्य विकासक कोण..येणारा काळच सांगेल कुणाच्या गळ्यात विजयाची माला पडते...
