सोगाव - अब्दुल सोगावकर :
चोंढी येथे सुनिल तटकरे यांची जाहीर सभा,
येत्या २०२४ च्या निवडणुकीत कोण कुणाला हद्दपार करणार हे रायगड ची जनता ठरवणार आहे, उद्धव ठाकरे यांचा आत्मा जसा मुंबई महापालिकेत आहे, तसा शेकापचा आत्मा जिल्हा परिषदेत आहे. आम्ही मागील पाच वर्षात सर्व समाजांना सोबत घेऊन अनेक विकासकामे केली आहेत. तसेच यापुढेही रेवस रेड्डी सागरी महामार्ग असो वा विरार अलिबाग कॉरिडॉर असो, अशा प्रकारच्या विविध विकासकामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील प्रचार सभेत विरोधकांचा समाचार घेत बोलताना सांगितले...
तसेच विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्याने ते अल्पसंख्याक
समाजातील मतदारांमध्ये व्हाट्सएपच्या व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या पाठिशी आम्ही काल देखील होतो, आजदेखील आहोत आणि उद्या देखील राहणार असल्याचे सांगितले...
सुनिल तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे पाहत सांगितले की, चोंढी हा तुमचा बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्यातील प्रत्येक घराघरात घड्याळ पोहचवा, मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत प्रचारावेळी धनुष्यबाण सांगत होतात, यावेळी मतदारांना घड्याळ सांगायचे आहे आणि ऑक्टोबरमध्ये आम्हाला धनुष्यबाण सांगायचे आहे... तसेच पेण मध्ये कमळ सांगायचे आहे, जे आहे ते आहे... 'मापात पाप नाही आणि हिशोबात तूट नाही', असे सांगत घड्याळ चिन्हावरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी यावेळी केले...
यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील विकासाचे मुद्दे उपस्थित करत आजपर्यंत शेकडो कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून आणण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे सांगत यापुढेही अलिबाग तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूचित केले... यासोबतच व्यासपीठावर इतर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी भाषणे केली...
यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासह अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, ज्येष्ठ शिवसेना नेते (शिंदे गट) विजय कवळे, कामगार नेते दिपक रानवडे, माजी जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी, शिवसेना(शिंदे गट) अलिबाग तालुका युवा प्रमुख संदेश थळे, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, मापगाव शिवसेना(शिंदे गट)विभाग प्रमुख जगदीश सावंत,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट), भाजपा, शिवसेना(शिंदे गट), आरपीआय (आठवले गट) व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात- चोंढी येथे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचे स्वागत करताना किहीम सरपंच प्रसाद गायकवाड व इतर मान्यवर,
दुसऱ्या चित्रात : चोंढी येथील प्रचार सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे
