कोलाड (श्याम लोखंडे ) नंदकुमार कळमकर
खांब विभागीय कार्यकर्त्यांसमोर दिले आश्वासन
३२ रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघात पुन्हा सुनील तटकरे यांना लोकसभेसाठी दिल्लीत पाठविण्यासाठी रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायती मधील गोवे, मूठवली व शिरवली येथील ग्रामस्थांनी १००%मतदान सुनिल तटकरे यांना करण्याचा निर्धार केला असुन गोवे येथील प्रचार सभेत खांब विभागीय कार्यकर्त्यांसमोर तिन्ही गावातील ग्रामस्थांकडून आश्वासन देण्यात आले आहे...
कार्यसम्राट कर्तव्य दक्ष कोकण विकासाचे शिलेदार महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी खांब विभागीय कार्यकर्त्यांनी गोवे ग्रामपंचायतीच्या गोवे,मूठवली व शिरवली येथे प्रचार सभा मंगळवार दि.३० एप्रिल रोजी खांब विभागातील जेष्ठ नेते नारायण धनवी व प्रकाश थिटे यांच्या शुभहस्ते गोवे येथील सोमजाई मंदिरात रात्री ठीक ९:३० वाजता श्रीफळ वाढवून करण्यात आले..
प्रसंगी जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, नारायण धनवी, प्रकाश थिटे,वसंत मरवडे,विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,तळवली सरपंच रविंद्र मरवडे,सदस्य नरेंद्र पवार,नितीन जाधव,रमण कापसे, संदेश कापसे,लहू पिंपलकर,राकेश कापसे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण पवार, गावकमेटी अध्यक्ष बळीराम जाधव,सर्व कमेटी सदस्य,राजा जाधव, महेंद्र जाधव तसेच समस्त गोवे ग्रामस्थ,महिला मंडळ,तरुण वर्ग, बौद्ध वाडी,आदिवासी वाडी येथील असंख्य नागरिक उपस्थित होते...
यावेळी प्रचार सभेत नरेंद्र पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच रामचंद्र चितलकर, नारायण धनवी, वसंत मरवडे,प्रकाश थिटे,तसेच तळवली सरपंच रविंद्र मरवडे, या सर्व कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले.गोवे गावातील ऐकी ही अनेक वर्षांपासून टिकून आहे हे रस्ता रुंदीकरणासाठी गावानी दिलेल्या योगदानवरुन दिसून येते.त्यामुळे गोवे ग्रामपंचायतची सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून कोटीवधीची विकास कामे झाली आहेत.यापुढे ही असंख्य विकास कामे करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरेना येत्या ७ मे ला आपले मत देऊन विजयी करा असे सांगण्यात आले तसेच गावाकमेटी अध्यक्ष बळीराम जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानताना आमच्या बूथ वर १००% मतदान करण्यात येईल असे गावाच्या वतीने सांगण्यात आले...
