सोगाव -अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील मूनवली गावचे सुपुत्र व रायगड पोलीस दलात कार्यरत असलेले जगदीश बारे यांना पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकतेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 'डी. जी. इन सिग्निया' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे...
याबद्दल रायगड पोलीस जगदीश बारे यांचा जय हनुमान मित्र मंडळ, मुनवली ग्रामस्थ, महिलावर्ग आणि पंचक्रोशीतील मित्रपरिवार यांनी बुधवार दि.१ मे २०२४ रोजी संध्याकाळी मूनवली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा देत जाहीर सत्कार केला. याचवेळी जगदीश बारे यांच्या पत्नी जान्हवी बारे मॅडम व माजी ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांचा १ मे रोजी असलेला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
मूनवली येथील अजित हरवडे सर यांना काव्य व साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा देखील यावेळी जाहीर सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या...
यावेळी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, विजय(बाबू) थळे, चोंढी येथील डॉ. किरण शेट्ये, नदीम आत्तार, सुनिल अनमाने, सुभाष माने, प्रकाश गुळेकर, रायगड पोलीस अनंत सकरे, प्रशांत सकरे, निलेश नागावकर, अरविंद मसुरकर, दिलीप मोंढे, संजय सोनावणे, संतोष जाधव, राजेश परब, सुधाकर मल्हार, किरण भगत, माहीद कुर, शफी वाकनिस, जमीर वाकनिस, मजीद कूर, मुद्स्सर कुर, सलमान कूर, जयेंद्र राऊत, अशोक नाईक, प्रभाकर मोहिते, महेश सावंत, गितेश करळकर, सातमकर, दत्ताराम राऊत गुरुजी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते...
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली...
फोटो लाईन : मूनवली येथील रायगड पोलीस दलातील जगदीश बारे यांना डी. जी. इन सिग्निया पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर,
