महाराष्ट्र वेदभुमी

धोकवडे येथे इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन



सोगाव - अब्दुल सोगावकर :

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

 अलिबाग तालुक्यातील धोकवडे विभागात मंगळवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला...

        यावेळी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते यांनी धोकवडे विभागातील घरोघरी जाऊन मतदारांना प्रचार पत्रके देत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले...

    या रॅलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते शंकरराव(आप्पा) म्हात्रे, ज्येष्ठ काँग्रेस नेते नरहरी तोडणकर(गुरुजी), शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)मांपगाव उपविभाग प्रमुख नितेश कृष्णा कडू, माजी उपसरपंच सचिन म्हात्रे, माजी सदस्य तुकाराम तोडणकर, सतिश म्हात्रे, प्रशांत गावंड, शिवराम म्हात्रे, जगन म्हात्रे, अमर धोंडसेकर, शिवप्रसाद तोडणकर, समिर नागवेकर, पी. जी. म्हात्रे, राजाराम म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, प्रविण म्हात्रे, नितीन गावंड, समिर भगत, निलेश माळवी , बळीराम पाटील, प्रणित कडवे, मयूर दळवी, व इतर शेकाप, काँग्रेस, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : धोकवडे येथे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रॅलीत सहभागी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,

Post a Comment

Previous Post Next Post