उरण ( सुनील ठाकूर)
२७ एप्रिल २०२४ रोजी उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे, यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते... यावेळी त्यांचे गव्हाण जिल्हा परिषद मध्ये उलवे शहरात महायुतीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले... यावेळी भाजप विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे, शिवसेने तर्फे गव्हाण विभागीय प्रमुख प्रभाकर पाटील, उलवे शहर प्रमुख एडवोकेट भरत देशमुख, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, तर राष्ट्रवादीच्या अजित गटाचे अध्यक्ष संतोष काटे, मनसेचे विभागीय अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख.. श्रीमती नंदिता म्हात्रे, सौ श्वेता पाटील, एडवोकेट ऐश्वर्या पाटील, सौ.सुषमा कोळी, सौ सुवर्णा कोळी व सहकारी मान्यवरांनी उमेदवार बारणे यांचे जोरदार स्वागत केले.. यावेळी आमदार महेश बालदी, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत ही उपस्थित होते... खासदार आप्पा बारणे यांना त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या...
प्रचार रॅलीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे स्वागत करताना गव्हाण विभागीय प्रमुख प्रभाकर पाटील, उलवे शहर प्रमुख एडवोकेट भरत देशमुख, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत सह अन्य मान्यवर उपस्थितीत...
यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली..महिलांनी या रॅलीत आपला सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शविली...