महाराष्ट्र वेदभुमी

धानकान्हे आदिवासीवाडी शाळेत नवगत विद्यार्थ्यांचा पूर्वतयारी मेळावा,औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत.



कोलाड (श्याम लोखंडे ) 

रोहा तालुक्यातील धानकान्हे आदिवासी वाडी येथे माहे जून २०२४ तसेच १५  डिसेंबर २०२४ पर्यंत ६ वर्ष पूर्ण होत असलेल्या दाखल पात्र विद्यार्थ्यांना शुक्रवारी १९ एप्रिल २०२४ रोजी शाळेत प्रवेश करून शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करून या नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेतील शिक्षक वर्गाने त्यांचे औक्षण करत वर्गात प्रवेश देत मोठ्या उत्साही वातावरणात केले ...

रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासीवाडी शाळेत येताना शाळेविषयी असलेली मनातील भीती कमी व्हावी त्याचे शैक्षणिक भविष्य सुखकर व आंनदायी जाण्यासाठी येथील शिक्षक वर्गाने तसेच शालेय व्यवस्थापन समिती अंतर्गत शाळेत प्रवेशोसत्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन चिमुकल्यांचे लेझिम पथकाच्या गजरात तसेच वर्ग खोलीत प्रवेश करतांना या लहानग्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या लहानग्यांना त्यांचे हात धरून बोलून शाळेत पहिले पाऊल टाकून व औक्षण करून त्याचे शाळेत प्रवेश करून घेतले.

चिमुकल्यांचे लेझिम पथकाच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करत प्रवेश.

त्यावेळी त्याची नोंद करत त्यांचे जन्म तारीख,वय, वजन, उंची, यांचे मापन करून त्यांच्याकडे असलेल्या बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता सामाजिक आणि भावनिक क्षमता यावर विविध कार्ड चित्र तथा खेळ घेऊन चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा द्विगुणि आनंद दिसून आला. बालवाडी, अंगणवाडी,नंतर शाळा म्हणजे खेळ गाणी गप्पा आहे ही भावना घेऊन आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात करताना पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बराच काही सांगून जात असल्याचे दिसुन येत होते...


नवगत चिमुकल्यांच्या स्वागताला शाळेतील वर्ग खोल्या कणा रांगोळी फुलांनी सजविलेल्या होत्या तर शाळेत असलेले शैक्षणीक साहित्यातील विविध कलाकृती, हस्त चित्र, खेळाचे साहित्य, बौद्धिक साधन, स्लोगन फलक ही मांडण्यात आली होती तर विशेषतः सर्वांनाउत्साहितकरणारे सेल्फी पॉईंट.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.श्यामभाऊ लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक मारोतराव कोरडे, शिक्षिका श्रीम्. शोभा अरुणकुमार सोननीय - खांडेकर,सौ.मंजुळा रघुनाथ जाधव शा. व्य.स. सदस्या,सुवर्णा सचिन जाधव,वनिता सुनिल शेलार ( अंगणवाडी ताई),कलिना ज्ञानेश्वर वाघमारे उज्वला ज्ञानेश्वर वाघमारे,शा.पो.आ. कर्मचारी राजश्री साईनाथ पवार सह पालक वर्ग आदी शाळेतील विदयार्थी तसेच आठ इयत्ता पहिलीत प्रवेश करणारे नवगत विद्यार्थी उपस्थीत होते...

या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ श्यामभाऊ लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तर शाळेचे मुख्याध्यापक कोरडे सर,तसेच शिक्षिका शोभा मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले.नवगताना शाळेत प्रवेश दिला म्हणजे आपले काम झाल अस नसून आपली खऱ्या जबाबदारीला सुरुवात झाली असे बहुमोल मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या सह शिक्षिका शोभा मॅडम यांनी उत्तम नियोजन केले. शेवटी सर्व उपस्थित पालकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

प्रतिक्रया 

प्राथमिक शाळा धानकान्हे वाडी शाळेचे मुख्याध्यापक कोरडे सर आणि सोननीस तथा खांडेकर मॅडम यांनी अतिशय सुंदर असे नियोजन करून एवढ्या मोठ्या प्रमाणात पालकांचा सहभाग मिळवून शाळापूर्वतयारी मेळावा दर्जेदार आणि जोरदारपणे साजरा केला तसेच रांगोळीपासून ते स्वागत, सेल्फी पॉईंट या छोट्याशा गोष्टीतून दोघांची कलात्मक दृष्टी दिसून येत होती...

आदिवासी वाडी वरील विद्यार्थ्यांना खरोखरचं शाळेत यायला प्रोत्साहित करणारा उत्कृष्ट कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरा केल्याचा आनंद पुगाव केंद्राच्या प्रभारी केंद्र प्रमुख सलागरे मॅडम यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post