रायगड: (विशेष प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुरू असून इंडिया आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते व जयंतभाई पाटील यांनी पेण तालुक्यातील वढाव येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून पेण तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला...
यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभा उमेदवार अनंत गीते, आमदार जयंतभाई पाटील, नंदा म्हात्रे, किशोरभाई जैन, विष्णुभाई पाटील, सुरेन्द्र म्हात्रे, जगदीश ठाकूर, शिशिर धारकर, प्रशांत पाटील, पी डी पाटील, अशोक मोकल, महादेव दिवेकर, समीर म्हात्रे, दिपश्री पोटफोडे, स्मिता पाटील, प्रवीण पाटील, जीवन पाटील, महेश पोरे, अच्युत पाटील, चेतन मोकल, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभा उमेदवार अनंत गीते यांनी भाजपला भस्म्या रोग झाला असून त्याने कितीही खाल्ले तरी पोट भरत नाही... त्यामुळे ते स्वार्थी आणि विश्वासघातकी राजकारण करत आहेत...
यावेळी आमदार जयंतभाई पाटील व काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली...