शहानवाज मुकादम/रोहा
अलिबाग: दि:18 एप्रिल 2024,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए देशात काम करीत आहे. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. या नेतृत्वाखाली बलशाली देश, राज्य बनविण्याच्या भूमिकेतून ही निवडणुक लढवित आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष, रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- शिवसेना शिंदे गट- भाजप-रिपाइं महायुतीचे रायगड 32 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी आज गुरुवारी अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद अमदार भरत गोगावले, अमदार महेंद्र दळवी, माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...
कुरुळ बायपास येथे महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते,खासदार सुनील तटकरे रायगड चे पालक मंत्री सह अदिने मार्गदर्शन केले...
यावेळी व्यासपीठावर महायुतीतील घटक पक्षाचे नेते रायगडचे पालकमंत्री डाॅ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले,अमदार प्रशांत ठाकूर, योगेश कदम, महेंद्र दळवी, महेश बालदी, अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे, शेखर निकम, विनय नातू, सू्र्यकांत दळवी, किरण सामंत, धैर्यशील पाटील, नितीन सरदेसाई, दिलीप भोईर,पंचायत समीती रोहा चे माजी सभापती रामचंद्र सकपाळ,अॅड मनोजकुमार शिंदे, अमित घाग, हरिचंद्र वाजंत्री, उद्देश वाडकर, बशीर भाई धनसे,मुजम्मील गीते,ऍड महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते...