रोहा :प्रतिनिधी
हजारों हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक समजले जाणाऱ्या रोहा शहरातील प्रसिध्द गाझी शेख सलाऊद्दीन शाह बाबा दर्गाचे उरुस शनिवार दि.२० व २१ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कव्वालीचे जंगी सामने रंगणार आहेत. या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात हजारो हिंदू मुस्लिम बांधव बाबांचे दर्शन घेतात. तसेच बाबांचे मुरिद श्रध्देपोटी शहरातून वाजतगाजत रातीब मिरवणूक काढतात. या उरुस कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती उरुस कमिटीचे अध्यक्ष नसीम महाडकर यांनी दिली आहे...
शनिवार दि.२० एप्रिल रोजी दुपारी ३ वा. वाजतगाजत संदल शरीफची भव्य मिरवणूक व रातीब वरचा व खालचा मोहल्ला विभाग, बाजारपेठ व शहरातून मार्गक्रमण करीत या मिरवणुकीचे दर्गेत विसर्जन होईल. तद्नंतर जिल्ह्यातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव व भक्त दर्गावर फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतात. रविवार दि. २१ एप्रिल ला रात्री १० वा. गझल सम्राट इंटरनॅशनल सिंगर रईस अनीस साबरी व गझल क्वीन रोनक परवीन यांच्यात हिंदी मराठी कव्वालीचे जंगी सामने रंगणार आहेत. उरुसात लहान मुलांचे विविध खेळण्याची दुकाने, आकाश पाळणे, मिठाई दुकाने, विविध खाद्य पदार्थ, महिला व गृह उपयोगी वस्तू विक्रीची दुकाने लागतात व यामध्ये लाखो रूपयाची उलाढाल होत असते...
उरूस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नसीम महाडकर, उपाध्यक्ष हुसेन नुराजी, सेक्रेटरी आशीकहुसैन सवाल, जॉइंट सेक्रेटरी याकूब शेख, सल्लागार अलीम मुमेरे, तय्यबअली मुमेरे, नदीम सिद्दीक, सदस्य मुजीब सिद्दीक, नाझीम मुमेरे, हबीब डावरे, किफायत जंजिरकर, शहाबाज शेटे, समीर बडे, अली तव्वर, रफ़ीक खोपटकर मुजावर फकीरसाहब नुराजी यांच्यासह उरुस कमिटीचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या उरुस कार्यक्रमात सर्व हिंदू मुस्लिम बांधव व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे...
Hii
ReplyDelete