वार्ताहर: डोलवी पेण
पेण तालुक्यातील डोलवी (खालचा पाडा) येथे श्री हनुमान प्राण प्रतिष्ठापना मंदिर जीर्णद्धार सोहळ्याचे आयोजन डोलवी (खालचा पाडा) ग्रमस्थ ,महीला,तसेच युवक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून या प्रसंगी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत असून या सोहळ्यासाठी येथील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे असून याचा या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे..
गावचे आराध्य ग्रामदैवत धायरेश्वराच्या कृपेने व आपल्या बहुमुल्य अशा सहकार्याने आपल्या गावामध्ये श्री हनुमान मंदिराची नविन वास्तू तसेच श्री मुर्तिची प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ ते मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत आहे. सदर सोहळ्यामध्ये श्री हनुमंत मुर्तिची प्राणप्रतिष्ठापना, व इतर धार्मिक विधी, प्रवचन, हरिपाठ, भजन, किर्तन इत्यादी कार्यक्रम होतील तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून पुण्यकर्माचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ महीला मंडळ डोलवी खालचा पाडा यांनी केले आहे...
विशेषतः येथील ग्रामस्थांनी ग्रामस्थ सहकार्यातून ईतर कोणाचीही मदत न स्वीकारता हे भव्य दिव्य स्वरूपाचे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमंत राय यांच्या मंदिराचे जीर्णद्धार तसेच मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी १९ एप्रिल ते मंगळवारी २३ एप्रिल या कालावधीत येथे श्री हनुमान जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या दरम्यान १९ एप्रिल रोजी कळसयात्रा, ग्रामप्रदक्षिणा मंडप प्रवेश, प्रायश्चित्त विधी,जलाधिवास, धान्यादिवास तसेच सायं हरिपाठ ह.भ.प. निवृत्ती महाराज बळवली ,तर शनिवारी २० एप्रिल रोजी र्गीश पुजन, पुण्यवाचन, वास्तुमंडळ, सर्वतोभद्र, मुखपीठ पूजन, क्षेत्रपाठ मंडळ, ब्रम्ह व नवग्रह मंडळ पूजन, रुद्रपीठ पूजन स्थापित देवता होमहवन आदी धार्मिक विधी तद्नंतर महाप्रसाद तर सायं.७ ते ९ हरीकिर्तन ह.भ.प. संजय मारुती पाटील (अध्यक्ष विश्वकर्म वारकरी शिक्षण संस्था प्रबळगड, नवी मुंबई) यांचे .रविवारी २१ एप्रिल रोजी मुर्ती महाभिषेक, मंदिर प्रदक्षिणा, कलशपूजन, मुर्ति प्राण- प्रतिष्ठा (मुहर्त ११.०२), कलशारोहण, शिखरध्वज स्थापना, होमहवन पूर्णाहुती, महाआरती महाप्रसाद व सायं.७ ते ९ या वेळेत संगीत जागर भजन मुकेश बुवा डोलवी यांचे .सोमवारी २२ एप्रिल रोजी श्री हनुमान स्तोत्र, हनुमान चाळीसा वाचन ह.भ.प. दिनेश महाराज जनजागरण तसेच रात्रौ ८ ते १२ या वेळेत संगीत हरिभजन भजन सम्राट ह.भ.प. एकनाथ बुवा म्हात्रे यांचे तसेच मंगळवारी २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती निमित्त सुश्राव्य किर्तन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पुष्पवृष्टी, महाआरती, महाप्रसाद, तद्नंतर श्री हनुमंतराय यांचा पालखी सोहळा मिरवणुक असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून प्रसंगी ऋणनिर्देश-श्री हनुमान मंदिराच्या नविन वास्तु बांधणे करीता ज्या ज्या दानशुर दात्यांनी तन-मन-धनाने आर्थिक व वस्तूरुपात सहकार्य केले आहे. अशा सर्व दानशूर दात्यांचे ग्रामस्थ व महीला मंडळी डोलवी (खालचा पाडा) यांनी ऋण व्यक्त केले आहेत...
🙏🏻
ReplyDelete