![]() |
❓❓❓ |
उरण (सुनिल ठाकूर)
उलवे येते सेक्टर १८ मध्ये हेवी डिपॉझिट भरून प्रीतम प्रकाश सुर्वे हा युवक प्रियांका बिल्डिंगमध्ये राहत आहे...तो रायगड जिल्ह्याचा निवासी नाही...ही उलवे शहर,ग्रामीणचा निवासी नाही... रायगड जिल्हाच्या इतिहास भूगोल यास त्याचा काडीचा हि संबंध नाही... तरी तो, युवा सेनेचा उत्तर रायगडचा उपजिल्हाप्रमुख आहे...
हे सुदैवी की दुर्दैवी याचे स्पष्टीकरण युवा सेना प्रमुखांनी दिले पाहिजे...ते येथे मतदार आहेत किंवा नाहीत हे सुद्धा नक्की नाही...ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत... त्यांची युवा सेनेची नेमणूक करताना ते पालकमंत्री उदय सामंतांच्या गावचे आहेत, असे खोटे सांगण्यात आले आहे... याबाबत प्रत्यक्ष त्यांची माहिती घेत असताना असे सांगण्यात आले कि, उदय सामंत त्याना ओळखत हि नाहीत...त्यांच्यापासून त्याचे गाव खूप लांब आहे, उदय संबंधाच्या राजनीती सोबत त्यांचा काडीही संबंध नाही... तरी पण त्यांना इथे युवा सेनेचे पदाधिकारी नेमून हे "पालतू" राजकारण केले जाते... हे दुर्दैवी आहे,.
त्याहून अधिक कहर म्हणजे उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक समन्वय समितीत त्यांच्या नावाचा आग्रह धरून खोटेपणा केला जात आहे... या खोटेपणाची नेमकी "बिदागी" युवा सेना प्रमुखांना किती मिळाली?... हे त्याने स्पष्ट करावे... व आमच्यासारखे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या समर्थक, प्रकल्प, प्रकल्पग्रस्त युवक व माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचे समर्थक म्हणून या मतदारसंघात कार्यरत आहोत, त्यांच्यावर हा अन्याय केला जातोय...ह्या अन्याय करण्याची बिदागी नेमकी तुम्हाला कोण देतोय?...त्याचे हि स्पष्टीकरण करावे... अशी मागणी युवा सेना कार्यकर्ते, प्रसाद पाटील, अभिजीत पाटील, धनंजय कोळी, सचिन देशमुख शरद पाटील आदी प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी केले आहे...