शहानवाज मुकादम/रोहा रायगड
मो.7972420502
पेण तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या..
पेण पोलीसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आयकाव्यास मिळत आहे...
पेण तालुक्यात दि:13/09/23, रोजी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेची चोरी झाली होती...
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. 262/2023 भा.द.वी. कलम 454, 457, 380, प्रमाणे दि:13/09/23, रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता..
सदर गुन्ह्यात 2,86,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली होती...
सदर गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्य पूर्वक तपासाची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, मा.अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनानुसार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे, देवेंद्र पोळ पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पीएसआय पोलीस निरीक्षक समद बेग, एएसआय राजेश पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र भोनकर, पोलीस संतोष जाधव, प्रकाश कोकरे, सचिन वस्कोटी, अजिंक्य म्हात्रे, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे यांनी कौशल्य पुर्वक तपास करून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 1) शुभम मधुकर भोईर, रा. उंबर्डे फाटा. तर 2) ॠतिक जनार्दन माळी, 3) हर्षल प्रशांत म्हात्रे, 4)प्रतिक जिवन ठाकूर, तिन्ही रा.कोप्रोली ता. पेण यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण 2,10,400/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आसुन पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत...
