गोरेगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
दि.२१/०४/२०२४ रोजी मु.कशेणे,पो.तळाशेत, माणगाव-रायगड,रा.जि.प.शाळा कशेणे च्या प्रंगणात आरोग्य शिबीर तसेच विद्यार्थी -पालकांन साठी मोफत एम.पी.एस.सी,यु.पी.एस.सी.स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन कशेणे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते ते योग्य तसेच नियोजन बद्ध संपन्न झाला,तसेच १६० विद्यार्थी व पालकांनी ह्या शिबिरामध्ये सहभाग घेतला.सदर मार्गदर्शन शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून सत्यवान रेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच पंचक्रोशीतील जनतेने आरोग्य शिबीरामधे सहभाग घेतला...
ह्या कार्यक्रमासाठी ग्राम विकास कमिटीचे अध्यक्ष शामकांत शिंदे,गणेश शिंदे, आशाबाई वनिता मुंडे, गावचे पोलीस पाटील स्वरूपा मुंडे,अंगणवाडी मदतनीस उभारेताई, तसेच मायभूमी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष काप सर,सचिव सत्यजित भोनकर व मायभूमी संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली...
कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागताची भुमिका गावच्या शाळेय मुलींनी पार पाडली...
कार्यक्रम खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला.सदर कार्यक्रम लोकसहभागातून करण्यात आला. कार्यक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलं त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले...