महाराष्ट्र वेदभुमी

पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदार घेवून भीमशक्ती संघटनेचा अनंत गीतेंना पाठींबा



अलिबाग : विशेष प्रतिनिधी 

३२ रायगड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवार म्हणून गोपाळ तंतरपाळे यांनी त्यांचा २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून महाविकास आघाडीला भीमशक्ती संघटनेचा बिनशर्त पाठींबा असेल असे भीमशक्ती महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी सांगितले...त्यामुळे विजय हा अनंत गीते यांचाच होणार, असा विश्वास तंतरपाळे यांनी व्यक्त केला... 

             इंडिया आघाडीचे सर्व नेते विशेष करुन शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला...शिवसेनेचे स्थानिक नेते रुपेश जामकर, पेण येथील सबलीकरणाचे नेते उमेश लांगी, पिंपरी शहरचे संजय ताठे यांनी देखील मला विनंती केली होती...राज्यभरात एसी, एसटी समाजाच्या सबलीकरणासाठी आमचे नेते भीमशक्ती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्राकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे... 

              पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, बिरसा मुंडा सबलीकरण स्वाभिमान या दोन समुदायाच्या योजनांचे २५ ते ३० हजार लाभार्थी आहेत तर १ ते १.५ हजार जमीन देणारे शेतकरी या जिल्ह्यात आहेत... या दोन्ही योजनेंना केराची टोपली या विद्यमान खासदारांनी व सरकारने दाखवली आहे... परंतु शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी हि योजना नागपूरच्या अधिवेशनात गाजवली, पण विद्यमान मुख्यमंत्र्यांना ते अडचणीच होयील म्हणून त्यांनी जयंत पाटलांना सभागृहात बोलू दिले नाही आणि या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले... राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेलो होतो... मात्र, त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही... सुनील तटकरे व्यक्ती काम करणारी व्यक्ती नाही... महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी अत्यंत प्रामाणिक आहेत...

              शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी आमचा प्रश्न सोडवावा यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचे तंतरपाळे यांनी स्पष्ट केले...राज्यभरातील आमचे नेटवर्क वापरुन महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करु, तसेच रायगड लोकसभेत गीते यांना तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी करु, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले... गीतेंसारख्या स्वच्छ चारित्र्य आणि निष्कलंक उमेदवारांचा पराभव करणे तटकरे यांना कठीण आहे... देशात इंडिया आघाडीचेच सरकार येणार असून, आगामी विधानसभेच्या निवडणुकीतदेखील आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post