महाराष्ट्र वेदभुमी

आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा दि २२ एप्रिल पालखी तर २३ एप्रिलला यात्राउत्सव


रोहा :- वार्ताहर

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई श्री महादेवी माता 

खुप वर्षांपुर्वी भातसई गावातील गुराखी गाई चारण्यासाठी तळ्याकाठी गेला असता मिठकेशवर जाळी जवळ गेला असता महादेवी मातेने त्यास दर्शन दिले व सांगीतले मी गावाच्या पुर्व दिशेला मालावर प्रग्रट झाली आहे.महादेवी मातेंच स्वयंभू स्थान आहे.जुनी लोक अशी सांगतात की सरकारी अधिकारी यात्रा उत्सव बंद करण्यासाठी आले असता दैवी चा साक्षात्कार झाला व यात्रा उत्सवाला सरकारी परवानगी दिली गेली आहे. यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला दरवर्षी होत आहे. त्यासाठी जर दोन पौर्णिमा आल्यावर जेव्हा दुपारी ४ ते ७ वाजेपर्यत आहे. त्या दिवसाला उत्सव साजरा केला जातो. तसेच नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यासाठी नवस फेडण्यासाठी खुप भाविक येत असतात. देवीचा भक्त भगत चिंतामणी सखाराम खरीवले आता आहेत. देवीचा वारा खरीवले कुटुंबातील सदस्यांच्या अंगात आज ही येतं असतो..


हि यात्रा उत्सव दोन दिवस असते.यात्रेला मिठाई, खेळणीची दुकाने व्यवसायिक येतात नवसाच्या काट्या वाजतगाजत मिरवणूकने ढोल ताशांच्या गजरात येत असतात  यात्रेच वैशिष्ट्य म्हणजे पाठीला गळ टोचून घेतले जातात ही परंपरा आजही जागृतेची आहे...

हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी दुपरी १२वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री ७ वाजता आदर्शगाव  भातसई गावात घरोघरी  भक्तीमय वातावर्नात  फिरून महादेवी मंदिरात जाते. तसेच दुस-या दिवशी मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात  होते. त्यामूळे सकाळ पासुनच भक्तगण नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत आसतात. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्ह्यातील भक्तांचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम गळ लावणे. यावर्षीचा गळ मंगळवारी सायंकाळी ५-३० वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना गळ लावले जातात.त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते.या उत्सवासाठी  निडी,कोपरे,झोळांबे लक्ष्मीनगर,वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुंद्रुक, शेजारी गांवातील मानाच्या काट्या येतात.तसेच या देवीच्या उत्सवासाठी रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यसह विविध जिल्हयातील भक्तगण दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post