पुगांव - रोहा ( नंदकुमार कळमकर )
कलगीतुरा समन्वय समिती रायगड रत्नागिरी व कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ यांच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश महाबळे व कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांनी माणगाव येथे कुणबी भवन येथे संपन्न झालेल्या कलगीतुरा समन्वय समितीच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना मत व्यक्त केले...
दि. १४ एप्रिल २०२४ रोजी कुणबी भवन माणगाव येथे समन्वय समितीची सभा संपन्न झाली या सभेत मंडळाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात लोक कलाकार शाहीर यांच्या हितासाठी व कलेच्या उन्नतीसाठी संकल्प करतांना अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यानंतर अध्यक्ष सुरेश महाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठिंब्याचा प्रस्ताव मांडला यावर सभागृहातील उपस्थित सदस्यांनी यावर आपले मत व्यक्त करतांना खासदार सुनिल तटकरे व आमदार भरत गोगावले यांचे कला क्षेत्रात लाभलेले योगदान व सहकार्य यावर चर्चा करुन अभिप्राय व्यक्त केले...
कलाकारांना मिळणारे वृद्ध साहित्यिक मानधन पाच हजार केल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.तसेच राज्य शासनाने देखील वृद्ध कलाकारांच्या बाबतीत सकारात्मक राहून त्यांच्या हिताचा निर्णय करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच आगामी काळात कलाकारांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता व्हावी अशी सशर्त अपेक्षा व्यक्त केली सर्वानुमते सुनिल तटकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कलेच्या हितसंदर्भात कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे समन्वय समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,सचिव सचिन माळी, गोविंद शिंदे, दिपक भोस्तेकर, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले...
यावेळी सभेला श्रीधर वाळंज, वसंत भोईर, बाळा महाबळे,अरुण नाकती, नथुराम पाष्टे,संतोष भात्रे सतिश पवार, सहदेव ऐन दत्ता सुतार, बाळकृष्ण भोस्तेकर,सहदेव तेलंगे,लिंबाजी ऐन वामन शिंदे, प्रदीप भोस्तेकर,किशोर मोरे, अमित नवले, तसेच कोलाड, माणगाव, म्हसला, मंडणगड महाड पोलादपूर तालुक्यासह रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार उपस्थित होते...