शहानवाज मुकादम / रोहा
मो.7972420502
पंचायत समिती रोहा शेस फंड भ्रष्टाचार गाजत असतानाच आता जिल्हा परिषद शेस फंङअंतर्गत भ्रष्टाचार उघड!
जिल्हा प्रशासनाकडून शाखा अभियंता जुजगार व अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मांगणी...
रोहा: (दि:21 एप्रिल २०२४) तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील मुरुम भराव प्रकरण गाजत असतानाच दुसरा भ्रष्टाचार उघड झाला असुन संबंधित प्रशासनाकडून शाखा अभियंता जुजगार व अधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मांगणी...
सविस्तर, रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील मुरुम भराव टाकण्याचे खोटे इतिवृत्त तयार करुन काम न करताच बिल आदा करुन शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करून सदर कामात भ्रष्टाचार झालेला आहे...
खैरेखुर्दचे ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे गेल्या १५ वर्षापासून खैरेखुर्द ते खांबेरे ग्रामपंचायत वर काम करीत असुन ग्रामपंचायत खांबेरेत असतानाच ही हद्द बदलून भ्रष्टाचार झालेला आहे,..
नक्कीच खैरेखुर्द कब्रस्तानची हद्द कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते हा प्रश्न उपस्थित होत आहे...
सध्या खैरेखुर्द ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक कांबळे कार्यरत असुन खैरेखुर्द कब्रस्तान चे विकास कामे होत असलेने मग ही हद्द मर्जीनुसार बदलून पदाचा गैर वापर होत नाही का? आहे
दि:१५ मे २०२३, रोजी च्या राजिप अलिबाग करील सुनावणीचा निर्णय देण्यास जाणुन बुजून दिरंगाई होत आहे...सदरची सुनावणी अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बडे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती...
तक्रारदार शहानवाज मुकादम स्वतःच हजर राहुन लेखी व तोंडी महण्णा सादर करण्यात आला होता...
सदरच्या सुनावणीतीचा निर्णय राजिप अलिबाग यांच्याकडून आजतागायत मिळाला नाही...
सुनावणीच्या वेळेस तक्रारदाराकडुन लेखी म्हण्णे सादर केले आहे...
मुद्दा क्र
1) कामाचे ईडिट फोटो,
2) ग्रामपंचायत खांबेरेचे ग्रामसेवक आर पी पाटील यांनी भ्रष्टाचार उघड होउ नये म्हणुन सदरच्या कामाची माहिती निरंक देउन तक्रारदाराची दिशाभुल व फसवणूक केली आहे...
3) पंचायत समिती च्या यादीत सदर कामाचे नाव बिरवाडी कब्रस्तान येथे मुरुम टाकणे,
4) ग्रामपंचायत च्या दाखल्यावर कामाचे नाव बिरवाडी ते खैरेखुर्द कब्रस्तान मधये मुरुम टाकणे,
5) रोहा पोलीसांकडील माहितीनुसार कामाचे नाव बिरवाडी ते खैरेखुर्द कब्रस्तान रस्त्यात मुरुम टाकणे, आश्या एका कामाचे तिन नावे आसल्याचे उघड आहे...
6) ठेकेदारास रक्कम दिलेल्या 12 नंबर फॉर्मवर ठेकेदाराचे खोटे नाव व खोटी सही ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे यानेच केलेची तक्रारदाराचे मत आसुन कामाचे तिसरे नाव पांगलोली रस्ता दुरुस्त करणे आसे आहे, सदर च्या भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होणे आवश्यक आसताना संबंधितांची पाठराखण प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून होत आहे...
तसेच पंचायत समिती रोहा शेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचार गाजत आसतानाच आता नव्यानेच राजिप शेस फंडअंतर्गत खैरेखुर्द कब्रस्तान गटार दुरुस्ती चे काम निकृष्ट दर्जेदार आसुन भ्रष्टाचार उघड झाला आहे...
खैरेखुर्द कब्रस्तान गटार दुरुस्ती कामातील भ्रष्टाचार करून बिल आदा होणे पुर्वीच खैरेखुर्द ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच मुजम्मील गीते यांनी योग्य वेळेत दखल घेतल्याने रक्कम रु, 4,99000/- च्या निधीतील गटारच्या स्लॅबमध्ये स्टील नसल्याचे स्पष्ट झाले आहे...
सदर प्रकरणी एस एस जुजगार शाखा अभियंता पंचायत समिती रोहा,ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे व संबंधितांविरुद्ध संगनमताने खोटे इतिवृत्त तयार करून शासनास दाखवून व भासवून फसवणूक व दिशाभूल करून मुरुम भराव प्रकरणात भ्रष्टाचार केला आहे, वरिष्ठांकडून पाठराखण होत आसल्याने विना स्टील चा निकृष्ट दर्जेदार स्लॅब व जुन्याच गटारावर पॉइंटीग करून भ्रष्टाचार करण्याचा हा नवा प्रकार उघड झाला आहे...
सदर प्रकरणी आता तरी बिडिओ रोहा यांच्याकडून प्रामाणिकपणे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार का?
की पुन्हा पाठराखण करण्यात येणार हे देखील बघावयास मिळणार आहे...
सदर विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांच्याकडून दखल न घेतल्यास संबंधित प्रशासनाविरुद्ध न्यायालयाकडून दाद मागण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे चणेरा विभाग प्रमुख शहानवाज मुकादम यांनी अंतीम ईशारा दिला आहे...