महाराष्ट्र वेदभुमी

दिव्यांगास दिव्यांगांची धाव,दानशूर व्यक्तींना राजेश ठाकूर यांच्या मदतीसाठी विविध दिव्यांग संघटनेतर्फे आवाहन


उरण दि २३(विठ्ठल ममताबादे)

विविध सामाजिक संस्था संघटना व दिव्यांग संस्था संघटना यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दिव्यांग व्यक्तीला आर्थिक मदतीची गरज होती. रुपेश म्हात्रे व दिव्यांग सामाजिक संस्था उरण, शिवशंभो दिव्यांग संघटना, नगरपरिषद उरणचे कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी तसेच विविध दिव्यांग सामाजिक संस्था संघटना यांनी केलेल्या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद मिळाला आहे...एक दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी सर्व दिव्यांग धावून गेले आहेत...उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी राजेश ठाकूर यांना मदतीचा हात दिला आहे...

    सारडे गावात राहणारे राजेश धनाजी ठाकूर हा गरीब कुटुंबातला मुक -  बधिर दिव्यांग मुलगा कुठेही मिळेल तिथे लेबरचा काम करायचा, काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला त्याची पूर्ण बॉडी चेक अप केली तेव्हा समजल की त्याला हाडाचा कॅंसर झाला, औषधे चालु केली पण आताच्या घडीला दोन-दोन दिवसांनी त्याला डायलिसिस करण्यासाठी खारघर येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते... ही बाब लक्षात येताच सर्वांनी त्याला मदतीचा हात दिला आहे...दिव्यांग सामाजिक संघटना उरण, शिवशंभो दिव्यांग संघटना, उरण नगर परिषदेचे कर्मचारी,दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी दिव्यांग राजेश ठाकूर यांना मदत केली आहे...

     एक दिव्यांग दुसर्‍या आजारी दिव्यांग बांधवांला मदत करायला पुढे आला आहे यावरून आज हेच दिसून आले की अजूनही माणुसकी जिवंत आहे... माणसाने माणसाशी माणसासम वागणे , एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या  वृत्तीनुसार प्रत्यक्ष मदत करून गरीब राजेश ठाकूर यांना मदत करण्यात आली...सारडे येथील दिव्यांग बांधव राजेश ठाकूर  हे एक दीड वर्षाची मुलगी आणि सातवीत शिकणारा मुलगा आणि पत्नीसह कुटुंब जगत आहेत... त्या दिव्यांग कुटुंबातील कर्त्या पुरुषाला लवकर बरं होण्याची प्रार्थना सर्व दिव्यांग बांधव व विविध सामाजिक संस्था, संघटना, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी केली असून विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी दिव्यांग राजेश ठाकूर यांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले आहे...

कोट( चौकट ):-

दिव्यांग राजेश ठाकूर यांना कोणाला आर्थिक मदत करायची असल्यास खालील बँक खात्यात करू शकता...

खातेदाराचे नाव :राजेश धनाजी ठाकूर

बँकेचे नाव -युनियन बँक, शाखा कोप्रोली (उरण), तालुका उरण, जिल्हा रायगड.

अकॉउंट नंबर -618002010002039

आयएफएससी कोड -UBIN0561801

Post a Comment

Previous Post Next Post