महाराष्ट्र वेदभुमी

ऍड भरत जगन्नाथ देशमुख यांची शिवसेनेच्या उलवे शहर प्रमुखपदी निवड!


उरण ( सुनिल ठाकूर)  

स्थानिक प्रकल्पग्रस्त व बाहेरील रहिवाशी या वादावर आज अखेर आज शिवसेना आमदार महेंद्र थोरवे व शिवसेना उत्तर रायगड  जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी महत्वपूर्ण निर्णय घेऊन पडदा टाकला. शिवसेना उलवे शहर प्रमुख पदी ऍड. भरत देशमुख  यांची नियुक्ती केली... 

  आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी तसे पत्र भरत देशमुख यांना उत्तर रायगड शिवसेना संपर्क कार्यालय कर्जत येथे दिले आहे... यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते... भरत देशमुख हे उलवे शहर मधील  खारकोपर मधील निवासी असून प्रतिष्ठित देशमुख  कुटुंबातील ते सन्माननीय सदस्य आहेत... तर पेशाने ते वकील आहेत... 

  शहरातील उच्चशिक्षितांना ते निश्चित मार्गदर्शक ठरतील... उलवे शहर मधील सर्वच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या नेमणूकिनी आनंद झाला आहे... सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे... स्थानिक  प्रकल्पग्रस्त शिवसैनिकांना न्याय मिळालां अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे...

उलवे शहर प्रमुख पदी नेमणूक पत्र देताना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उमेदवार खासदार बारणेंचे प्रतिनिधी, माऊली, रमेश म्हात्रे, उरण तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post