महाराष्ट्र वेदभुमी

मासिकपाळी विषयी मार्गदर्शन, बामणसुरे येथे आदिवासी वाडीवरील महिलांना



सोगाव - अब्दुल सोगावकर : 

वुमनएज फाऊंडेशन,मुंबई यांच्यातर्फे मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी चोंढी - बामणसुरे येथील आदिवासी वाडीवरील महिलांना मासिकपाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी व सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर कसा करावा व वापरानंतर व्हिलेवाट कशा प्रकारे लावावी, तसेच पाळी विषयी महिलांमध्ये असलेली समज - गैरसमज व आदिवासी महिलांना मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन्सचा उपयोग करून आपले शारीरिक आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करत मोठ्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले... 

          या कार्यक्रमाचे आयोजन  पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी यांच्या सहकार्याने तसेच वुमनएज फाउंडेशन, मुंबईच्या संस्थापिका आरती परशुरामपुरीया यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते...

 यावेळी ग्रामपंचायत सदस्या जागृती झेरंडे, कल्पिता आमले, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड, प्रदीप पाटील, नदीम आत्तार व बामणसुरे आदिवासी वाडीवरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...

फोटो लाईन :  वुमनएज फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात चोंढी-बामणसुरे आदिवासी वाडीवरील महिलांना मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करताना उपस्थित महिला वर्ग,

Post a Comment

Previous Post Next Post