कलोते_खालापूर १२ एप्रिल (अजय शिवकर)
उरण विधानसभा मतदारसंघाच्या टोकावर असलेल्या खालापूर तालुक्यातील कलोते पंचायत समिती विभागात कलोते येथील प्रमुख शिवसैनिकांची आढावा बैठक गुरुवार ११ एप्रिल ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा मा आमदार श्री. मनोहर शेठ भोईर यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या मागण्या संदर्भात आढावा बैठक घेतली, त्यांच्या या बैठकीमुळे कलोते येथील शिवसैनिकांमध्ये एक चैतन्याचे वातावरण तयार झालेले आहे, आपला हक्काचा माणूस आपल्याला येऊन भेटून व आपले प्रश्न जाणून घेतले त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले...
सदर वेळी जिल्हा परिषद सदस्य श्री मोतीराम ठोंबरे, चौक जिल्हा परिषद विभागप्रमुख श्री प्रफुल विचारे, कलोते पंचायत समिती विभागप्रमुख तुळशीराम पाटील, चौक विभाग संपर्कप्रमुख कुमार बोराडे, कोलखे शाखाप्रमुख कमलाकर बोराडे, विणेगाव शाखाप्रमुख दिनेश महाडिक, जेष्ठ कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्रफुल महाडिक, भाई पाटील, जगन बोराडे व शिवसैनिक उपस्थित होते..

