युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक संघटना यांच्या कार्याची दखल घेऊन बुलडाणा फिल्म सोसायटी यांच्याकडून रविवार दिनांक ७/४/ २०२४ राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले..
सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत असणाऱ्या या संघटनेला सामाजिक कार्य पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार महणजेच गेली दोन वर्षे सर्वांनी सहकार्य व सामाजिक कार्याला साथ दिल्याची एकमेव अशी पोच पावती आहे..
राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार बुलढाणा तालुका हा युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक संघटना यांचे सहकारी सदस्य व पदाधिकारी व सल्लागार अमर खेरटकर संस्थापक ,विचारक. मनोहर जाधव अध्यक्ष गणेश शिंदे( उपाध्यक्ष) प्रदीप चोरगे (सहचिटणीस) सल्लागार / देविदास शिगवण, रोशन पाटील , बाबुराव चोरगे ,गणेश निर्मळ , संतोष जाधव प्रभारी सचिव व मयूर शिगवण संघटक प्रमुख या सर्वांनी सहकार्य व सामाजिक कामाला साथ दिलीय..आपन एका समाजाचे देणे लागतो आणि या अनुषंगाने सर्व एकत्र येऊन स्थानिक रहिवासी व विद्यार्थ्यांचे प्रश्न व मुंबई ते चाकरमान्यांचे प्रश्न गेले दोन वर्षे सोडविण्यासाठी प्रयत्नशील असे एक सामाजिक कार्य करत आहात आणि त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला...
युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार बुलढाणा तालुका यांचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर वाडेकर याच्या सहकार्याने हा कार्यक्रम बुलढाणा तालुक्यात संपन्न झाला..
