शहानवाज मुकादम/रोहा
मो.7972420502
रोहा तालुक्यात न्हावे केंद्रस्तरीय 2023/24 ची आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न ;
रोहा: तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्र न्हावे, येथे दि:24 एप्रिल 2024, रोजी न्हावे केंद्र स्तरीय सन 2023/24 चा आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित कार्यक्रम संपन्न...
" शिक्षणाची ठेवुन जाण, आपल्या विद्यार्थ्यांवर ठेवून ध्यान, आपण दिले बहुमूल्य दान, त्याबद्दल हा विषेश सन्मान "
खैरेखुर्द राजिप प्राथमिक उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मो.तारेख मो. फारुख यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण यासाठी आणी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण गुणवत्ता वाढीसाठी अविरत कार्य करीत असून शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय कार्याचा गौरव म्हणून प्रशस्तीपत्र देउन सन 2023-24 चा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला...
तसेच रोहा तालुक्यातील तळवडे आदिवासी वाडी जिल्हा परिषद शाळेस सन:2023/24 ची आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त ठरली...केंद्र प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सन्मानित कार्यक्रम संपन्न झाला...
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख दिपक घनश्याम पाबरेकर असुन प्रमुख उपस्थिती केंद्र शाळा न्हावे चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण मनोहर झुरे,न्हावे शाळेचे मुख्याध्यापक गणेश बिरवाडकर, नजमा शेख,फकीर ईसराईल, तवर सर,बागडे सर,मुंगसे मॅडम व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते...