अलिबाग : शरद पाटील
हनुमान जयंतीनिमित्त मुरुड तालुका वळके स्वस्तिक प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर
मुरुड तालुक्यातील वळके मधील स्वस्तिक प्रतिष्ठान तर्फे हनुमान जयंतीनिमित्त पर्व तिसरे मंदिर परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते...यावेळी नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला..सुमारे ४४ रक्तदात्यानी आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले...
अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी कर्मचारी डॉ. गोसावी सर व त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने शिबिराचा हा कार्यक्रम यशवीरित्या पार पडला... या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वस्तिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश शंकर भगत यांच्या हस्ते करण्यात आले....तसेच उपस्थिताचे स्वागत स्वस्तिक प्रतिष्ठान उप अध्यक्ष अरविंद गोविंद धनावडे व इतर स्वस्तिक प्रतिष्ठानचे सभासद यांनी केले....सुमारे ४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून अत्यंत मोलाचे असे योगदान दिले..


