महाराष्ट्र वेदभुमी

छावा संघटनेच्या वतीने pick n sip कंपनीवर कारवाई करण्यांदर्भात जिल्हधिकारी रायगड यांना दिले निवेदन...



शहानवाज मुकादम/रोहा दि:३० मार्च २०२४

म्हसळा: मागील काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात बाटलीबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमधून दुषित पाणी पुरवठा केला जात असल्याबाबत कोंकण २४ न्यूज च्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली होती...

 ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे असणारी pick n sip कंपनी कडून मोठ्या प्रमणात दुषित पाणी पुरवठा सुरू असल्याबाबत माहिती देण्यात आली होती...

 तर सदर pick n sip कंपनीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे दिसून येते, तर याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे म्हसळा तालुका अध्यक्ष अझहर धनसे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दि: २८/०३/२०२४ रोजी तसेच अन्न व औषध प्रशासन रायगड यांना दि:३०/०३/२०२४ रोजी ईमेल द्वारे निवेदन सादर केले असल्याचे धनसे म्हणाले...

 रायगड जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या बाटलीबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करीत असताना आपल्या ग्राहकांचे आणि सोबतच जिल्ह्याचे आरोग्य कसे राखले जाईल याचा विचार करणे आवश्यक असताना pick  n sip सारख्या कंपनी मार्फत दुषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड केली जात असल्याने रायगड जिल्ह्यात फक्त पैसा कमविण्यासाठी अशा कंपन्या उभारत असल्याचे मत छावा संघटनेचे म्हसळा तालुकाध्यक्ष अझहर धनसे यांनी बोलताना व्यक्त केले,..

 तसेच रायगड जिल्ह्यात अशा कोणत्याही कंपन्या कार्यरत असतील ज्या सर्व सामन्यांना अहितकारक असतील अशा कंपन्यांविरुद्ध नेहमीच न्यायासाठी लढा देत राहू अशी आपली भूमिका धनसे यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. तर pick n sip कंपनीवर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन रायगड यांच्याविरोधात आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही धनसे यांनी बोलताना दिला...

Post a Comment

Previous Post Next Post