शहानवाज मुकादम/रोहा दि:३० मार्च २०२४
रोहा :तालुक्यातील अष्टमी येथे ६० वर्षाच्या आजोबाना पडलेल्या अवस्थेतुन उचलुन तात्काल रुग्णालयात दाखल करुन पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे आणी समाज सेवक बिलाल मोरबेकर यांनी आजोबाना दिले जीवनदान.
रोहा येथील रिक्षाचालक व समाज सेवक बिलाल मोरबेकर हे अनेक वर्षांपासून आपल्या रोहा शहरात व जवळपासच्या परिसरातील तसेच तालुक्यातील रोहा शहरात व बाजार किवा तालुक्यातील कार्यालया ठिकाणी कामा निमित्त येणारे नागरिकांना नेहमीच मदत करत आहेत...
कुठे ही अपघात असो किवा रुग्णांना रुग्णालयात उपचाराकामी मदत असो नेहमीच आपला वेळ व स्वतःच रिक्षा उभी करून समाज सेवा करत असतात,
अष्टमी येथुन सौरभ चव्हाण या व्यक्तीचा बिलाल याना फोन आला आणि बिलाल तेथे गेले त्यावेळी एक ६० वर्षाचा आजोबा आजारी होउन पडलेल्या अवस्थेत दिसुन आले..
लगेचच बिलाल व सौरभ यांनी सिव्हिल उप रुग्णालय रोहा येथे अॅडमिट केले, डॉ काळे यांनीही तात्काल उपचार सुरू केले. मात्र पेशंटची परिस्थिती वाईट होती... BP हाय होता ऑक्सिजन लेवल ही डाऊन होता...
रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांना बिलाल यांनी संपर्क केला असता त्यांनी ही लगेच मदत पाठवली...
पुढील उपचारासाठी पेशन्टला अलिबाग येथे हलवायचे होते... ते काम पोलिसांनी चोख बजावले व सहकार्य केले...
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक वेळेला नेहमीच हा प्रश्न समोर येतो की अशा प्रकारे आजारी पडलेल्या आजोबा आणि अनाथ लोकांसाठी काम करताना त्यांच्या रहाण्याचा आणि निवार्याचा प्रश्न समोर येतो...आजही अनेक बेघर लोक रस्त्यांच्या बाजूला उन्हा तान्हात पडलेल्या अवस्थेत दिसतात...समाज सेवक बिलाल व रोहा पोलीसांकडून होते तेव्हढी सेवा मिळत असल्याचे अनेकदा दिसुन येते...
रोह्यात येवढे मोठे मोठे नेते असून सुद्धा आबालवृद्ध यांच्या साठी वृद्धाश्रम नाही...तसेच सिव्हिल हॉस्पिटल आहे, पण पुरेश् सेवा नाहीत... अशी अवस्था आहे...तज्ञ cardiologist तसेच महिला रोग तज्ञ आजही रोहा शहराला लाभल्याला नाही...
अनेक छोट्या मोठ्या उपचारासाठी रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यातच प्रशासनाकडून ही मदत मिळत नाही...
आनेक वेळेस समाज सेवक बिलाल मोरबेकर आणी रोह्याचे माजी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी आनेक वेळेस रुग्णांना मदत केले चे चित्र समोर असतानाच पुन्हा दिनांक ३० रोजी रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे व बिलाल मोरबेकर यांनी ही तात्काल दखल घेऊन आजोबाला जीवनदान दिले,व पुढील उपचारास अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले...रोहा तालुक्यात अशा या कर्तबगार पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे सह पोलीस विभाग आणि बिलाल मोरबेकर यांना सलाम...