कोलाड (श्याम लोखंडे)
अष्टिवकर : रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात होळी उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आले. बाल गोपाळांसह वॄध्दां पर्यंत अनेकानी रंग उडवुन आनंदात उत्सव साजरा केला आहे...
रोहा तालुक्यात नागोठणे वगळता 181 सार्वजनिक व 57 खाजगी एकुण 237 होळयांना अग्नी देण्यात आले. रविवारी दुपारपासुन होळी सजवण्यास ग्रामीण भागातील लोकांनी सुरूवात केलेली. वयोवॄध्द तरूण व लहान मुलानी आपल्याला परीने जमेल त्या पध्दतीने होळी रचली. रात्री होळी मातेला अग्नी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांना धुळवडीचा बेत आखता आला नाही. तर काही ठिकाणी रंगाची उधळण तसेच सोबतीला मदीरा व मांसाहार यात लोकांनी रममान होत धमाल केली. सकाळ पासुनच लहान मुलांनी खऱ्या अर्थानी रंगाची उधळण करण्यास सुरूवात केली. 11 च्या सुमारास उत्सवाला रंगत चढल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरात दिसुन आले. रंगाची खरेदी होत असताना मटन, चिकन व दारूच्या दुकानात गर्दी दिसुन येत होती. या वर्षी होळीं उत्सावाच्या दरम्यान पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता...
- कोकणात होळी पोस्ताचा सण बुधवारी -
धुळवाडीला सोमवार आल्याने कोकणात मोठे महत्व असलेला होळी पोस्ताचा सण साजरा करता आला नाही. होळी पेटविल्यानंतर दुसऱ्या म्हण्जे धुलवडीच्या दिवशी ग्रामीण भागात व शहरात सर्वत्र होळी निमित्त मटणावळीचा पोस्त हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा मात्र धुळवडीचा दिवस सोमवारी आल्याने तिखट सण साजरा करता आला नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. धुळवड साजरी झाली मात्र ग्रामीण भागात महत्व असलेल्या यासणाचा संपुर्ण आनंद लोकांना घेता आला नाही. बुधवारी मात्र मद्यासह पोस्त्याच्या मटणावळीवर हात मारीत खऱ्या अर्थाने हा सण कोकणात साजरा होणार आहे...