कोलाड (श्याम लोखंडे )
कोकणातील आगळावेगळा शिमगोत्सव सुप्रसिद्ध आहे. पारंपारिक पद्धतीने खांब पंचक्रोशीतील अनेक गावात सर्वच ठिकाणी होळी उभारून पूजन करण्यात आले कोकणात शिमगा उत्सव व होळी उत्सवाला मोठा महत्व असून रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला सण हाय होळीचा सण हाय रंग पंचमीचा त्यामुळे शिमगो रंगला गो रंगला लाले लाल अशी लहान बालगोपालांकडून रंगाची उधळण करून होळी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आले..
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील खांब,वैजनाथ,शिरवली,मुठवली गोवे,पुई,पुगाव,नडवली, तळवली,चिल्हे,धानकान्हे,बाहे,देवकान्हे सह अन्य आदिवासी वाड्यांवर हा उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेचं तंततंतो पालन करून येथील ग्रामस्थांनी होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला..
मराठी महिन्याचा शेवटचा व अखेरचा सण म्हणजे फाल्गुन महिन्यातील होळी उत्सव आणि हा होळीसन कोकणात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो या निमित्ताने होळी,धुळवड,आणि धार्मिक व अत्यंत सर्व शुभ कार्यक्रमांसाठी समजली जाणारी रंग पंचमी उत्सव विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आनंदाने येथील ग्रामस्थ नागरीक साजरा करतात...
कोकण वाशियांचे श्रद्धास्थान स्वा.सु. नि. गुरुवर्य सद्गुरू अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर, यांचा वारसा लाभलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीत हा उत्सव अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम करत आनंदाने व एकत्रीत येऊन गावागावात साजरा करतात. तसेच वारकरी संप्रदाय परंपरा लाभलेल्या आध्यत्मिक आणि धार्मिक ,जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यानी या उत्सवाबद्दल व रंग पंचमी बाबत कित्येक वर्षांपूर्वी म्हटले आहे,दैन्य दुःख आम्हा न येती जवळी l दहन हे होळी होती दोष ll १ ll सर्व सुख येती माने लोटांगणी l कोण आणि त्यासी दृष्टी पुढे ll२ll आमचे मागणे मागू त्यांची सेवा l मोक्षाची नि दैवा कोणा चाड ll३ll आमुची आवडी संत समागम l आणिक त्या नाम विठोबाचे ll ४ll तुका म्हणे पोटी साठवला देव l न्यून्य हा भाव कोण आम्हा ll ५ ll
संत तुकाराम महाराज म्हणतात की श्री हरीच्या सततच्या चिंतनाने व नामस्मरणाने आयुष्यातील दैन्य दुःख आमच्या जवळ देखील येत नाहीत किंबहुना आमच्या सावलीला देखील उभे राहत नाहीत एवढेच नव्हे तर नामाने, त्याच्या सततच्या उच्चाराने आमच्यातील दोष व अवगुणांची होळी होऊन आमच्या ठिकाणी असलेल्या पापांचेदेखील संपूर्णपणे दहन झाले आहे. ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर मनुष्याला इच्छित अशी सर्व सुखे व ती देखील मानाने आमच्यापुढे आमच्या दिमतीला येऊन उभी ठाकतात परंतु त्यांच्याकडे देखील आम्ही ढुंकून पाहत नाही. कारण ते म्हणतात आमची आता एकच आवड राहिली आहे, एकच इच्छा बाकी आहे आणि ती म्हणजे संतसमागमाची, त्यांच्या संगतीची, त्यांच्या सानिध्यात राहण्याची व त्यांच्या जोडीने विठ्ठलाचे नाम घेण्याची...
तुकोबाराय शेवटी म्हणतात की आम्ही आमच्या पोटीच देव साठविला असल्यामुळे आम्हाला सर्व गवसल्या सारखेच झाले आहे त्यामुळे आमच्यापाशी काही नाही अशी भावना देखील आमच्या मनी येत नाही किंबहुना न्यूनगंडाचा भाव आम्हांला शिवत देखील नाही.आध्यत्मिक आणि धार्मिक विचारांचा वारसा लाभलेल्या खांब पंचक्रोशी व खांब देवकान्हे विभागात शिमगा होळी उत्सव मोट्या आनंद वातावरणात साजरा करण्यात आला,
पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आजही जपली जात आहे.आजही या सणाला मुंबईकर चाकरमनी गावाला आनंद हा सण साजरा करण्यातसाठी व आनंद लुटन्यासाठी येतात पूर्वी फक्त लाकडे व सरपण आदींची चोरी करण्यात येत असे. मात्र कालानुरूप हल्लीच्या काळात पर्यावरण पूरक काहीसा बदल झाला असल्याचे दिसून आले आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी हळकुंड शित,वेळ,सजवून नाचविण्यात येते. ही परंपरा प्रत्येक गावानुसार आपापल्या पद्धतीने बदलत असते. होमाच्या रात्री गावातील सारेजण होळी माळावर एकत्रीत येतात. जळत्या होळीत भाविकांकडून नारळ अर्पण करण्यात येतात. त्यानंतर होम शांत झाल्यावर हे जळालेले नारळ बाहेर काढून त्याचा प्रसाद करून होळीची राख मस्तकाला लावली जाते.तर जागर म्हणून होळी माळावर विविध खेळ खेळले जातात अशा या शिमगोत्सवाची सांगता होळीचा पोस्त आणि वडे मटनावर ताव मारून झाल्यानंतर चाकरमान्यांची आपल्या रोजगाराच्या शहरांकडे जाण्यासाठी तयारी होते.