कोलाड :विशेष प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे बाहे विभागात प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत कुळवाडी भूषण शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवा निमित्ताने या विभागांत किल्ले रायगड ते गावातली शिव स्मारक स्थळ भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तर मशाल यात्रा प्रसंगी ढोल ताशे लेझिम पथक फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. गावागावात आनंदाचे वातावरण तसेच कणा रांगोळ्या फुलांनी गाव सीमा आणि परिसर सजवलेले होते विविध वेश भुषा परिधान करून लहान थोर मिरणुकित सहभागी झाले होते तसेच उत्सव शिवजन्माचा, स्वराज्य कार्याचा,या अनुषंगाने या परिसरातील ऐतिहासिक शिवकालीन आसलेल्या सुरगडाच्या पायथ्याशी घेरासुरगड येथे ग्रामस्थ व युवक मंडळ यांच्या वतीने नव्याने शिव स्मारक उभारण्यात आले.तसेच मौजे नडवली येथे गावदेवी मित्र मंडळ, मुंबईकर तसेच ग्रामस्थ व महीला मंडळ यांच्या विशेष सहकार्यातून भव्य आणि दिव्य असे शिव स्मारक उभारण्यात आले असून या प्रसंगी या स्मारकाचे विविधवत पद्धतीने पूजन करण्यात आले....
खांब परिसरातील खांब, वैजेनाथ , घेरासुरगड, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे आणि बाहे परिसर संपुर्ण विद्युत रोषणाईने तसेच भगव्या पताकाने सजले होते तर युग पुरुष शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोउत्सवानिमित्तने या विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घेरासुर गड व नडवली बाहे,येथे मशाल यात्रा शिव छत्रपतींची मिरवणूक,यात लाठी काठी मलखांब, ढोल ताशे लेझिम पथक,शिव चरित्राचे व्याख्याने,तसेच महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ल...
तसेच तळवली, धानकान्हे,बाहे येथे येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तर मौजे चिल्हे येथे धाक्सूद क्रिडा मंडळ यांच्या वतीने प्रोजेक्टर चित्रफीतद्वारे पावन खिंड हे चित्रपट दाखवण्यात आले.तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान तसेच चित्र कला स्पर्धा आयोजित करण्यात आले. तसेच यशस्वी रित्या पार पडलेल्या चित्रकलेत व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्याना या प्रसंगी आयोजकांकडून बक्षिस वाटप करण्यात आले...