महाराष्ट्र वेदभुमी

गोवे येथे श्री शिव जयंती उत्सव मोठया उत्साही वातावरणात साजरी


पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर )

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराजांची जयंती (तिथीनुसार) गुरुवार दि.२८ मार्च २०२४ रोजी विविध कार्यक्रमानी मोठया उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली... 

 या निमित्ताने बुधवार दि.२७/३/२०२४ रोजी शिव चौक गोवे येथून सायंकाळी ठीक ७.०० वा.किल्ले रायगड कडे प्रस्थान झाले.रात्री ९.०० वाजता किल्ले रायगड पायथ्याशी जेवण झाल्यावर रात्री १०.००वा. गड सर करण्यासाठी सुरुवात तसेच रात्री जगदेश्वराच्या मंदिर आरती व मशाल पूजन करून रात्री ठीक १.०० वाजता शिव विचारांची धगधगती मशाल घेऊन परतीची धाव घेत गुरुवार दि.२८/३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा.शिव चौक गोवे येथे आगमन, मशाल पूजन, व महाराजांची  आरती,दुपारी ३.०० वा.शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक सोहळा, व आरती करण्यात आली...

     रात्री १०.०० वाजता विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव,गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, खजिनदार कमलाकर शिर्के,नितीन जवके, सुभाष वाफिळकर, मनोहर मांजरे, रामचंद्र कापसे, पांडुरंग जाधव, नंदा जाधव,महेंद्र जाधव,निलेश वाफिळकर, भरत जाधव, राजेंद्र जाधव यांच्या उपस्थित नारळ फोडून नृत्य स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी झूळवा पाळणा बाळ शिवाजीचा,सवारी चौका मधी आंबा,एकच राजा येथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर,पाटलांनाचा बैल गाडा,पिचली माझी बागडी अशा लोकगीत,कोळीगीत, लावणी शेतकरी गीत,नृत्य स्पर्धकांनी आपली कला सादर करीत रसिकांची मने जिंकली, स्पर्धेचे सूत्रसंचालन निलेश जाधव यांनी केले तर सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी जय हनुमान मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली....

Post a Comment

Previous Post Next Post