💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐मिनाक्षीताई,एक विश्वासू अंदाज💐
------------------------------------------
मिनाक्षीताई,एक विश्वासू अंदाज
महिला शक्ती भाली शोभे ताज
जरी दूर गेल्या, आपल्यातून आज
याद त्यांची,शेकापवर करील राज
एक विश्वासू अंदाज
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
उपज त्यांच्यात महान संस्कारांची
छाप नाना पाटलांच्या आदर्शांची
समृध्दीला जोड अफाट बुध्दीची
दरा-यात विधानसभेत कामकाज
एक विश्वासू अंदाज
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
सतत विषय हाताळती समाजाचा
ध्यास मनी असे,महिला उध्दाराचा
अन्याया विरोधी,भास होई दुर्गेचा
त्यांना साथ देई, रयतेचा आवाज
एक विश्वासू अंदाज
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
उरणअलिबाग बांध जिव्हाळयाचा
जिद्दीने उकल होई, सा-या प्रश्नांचा
कुणी प्रयत्न केला आड येण्याचा ,
उत्तराला शब्दांच्या त्या तिरंदाज
एक विश्वासू अंदाज
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
अभिमानाने नाव कोरले जाईल
दिल्या भाषणात, उदोउदो राहील
त्या कधी ना थकल्या,ना दमल्या
पाटील शाही राखिली तर्रेबाज
एक विश्वासू अंदाज
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
जातीभेद कधी ना त्यांना शिवला
धर्म जोखडात आवाज ना दबला
लोकशाहीचा शब्दशब्द स्वीकारला
हिरकणी त्या,स्त्री मनावर विराज
एक विश्वासू अंदाज
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍️रायगडभूषण प्रा एल बी पाटील✍️
नवघर,उरण
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🍁🍂🌾🍁🍂🌾🍁🍂🌾🍁🍂🌾🍁🍂🌾🍁🍂
