सोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे गुरुवार दि २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली, यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मापगाव पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते...
शिवजयंती उत्सव दिनाच्या दिवशी सकाळी ८:३० वाजता मापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली, यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
यावेळी आमदार महेंद्र दळवी, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, अशोक नाईक, माजी सदस्य विजय भगत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, श्री क्लासेस चे संतोष राऊत सर, उत्तम राऊत, प्रभाकर मोहिते, दिलीप पात्रे, अजित घरत, गितेश करळकर, आर आर पाटील, दत्तात्रेय राऊत(धोंडू नाना), दत्ताराम राऊत(बंडू मास्तर), राजू घरत, मनिष म्हात्रे, मनोज काठे, मजीद कुर, मुद्स्सर कुर, संतोष रुत यांच्यासह मापगाव पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवर व सर्वस्तरातील मुले, मुली, महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे अतिशय चांगले आयोजन व नियोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचे कौतुक केले...
सकाळी ९ वाजता मापगाव गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी पंचक्रोशीतील सर्वस्तरातील मुले, मुली,महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, मिरवणुकीत जय भवानी जय शिवाजी यांचा जयघोष करण्यात आला...
सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. या सर्व रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले. दुपारी ४ ते संध्याकाळी ६ दरम्यान महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील महिला सौभाग्याचे वाण लुटण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रात्री ९ वाजता शिवजयंती उत्सव निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात :मापगांव येथे शिवजयंती कार्यक्रमात उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत करताना मान्यवर,
दुसऱ्या चित्रात : मापगाव येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आ. महेंद्र दळवी व उपस्थित मान्यवर,