सोगांव अलिबाग :अब्दुल सोगावकर
कार्यक्रमाला अनेक मान्यवर व महिलावर्गांची उपस्थिती,
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे ८ मार्च २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव" तर्फे आयोजित 'गौरव नारी कर्तृत्वाचा' या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मूनवली येथील मैदानावर करण्यात आले होते... यावेळी अनेक मान्यवर व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
या कार्यक्रमात मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील अनेक महिला व मुलींनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस, शासकीय, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, उद्योजिका, बचत गटांच्या महिला व अशा विविध क्षेत्रात आपल्या बुद्धी व कर्तृत्वाने उल्लेखनीय तसेच गौरवास्पद पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते 'गौरव नारी कर्तृत्वाचा' ह्या सोहळा कार्यक्रमात "ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव" तर्फे सन्मान करण्यात आला...
यावेळी मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील दोन महिलांना लकी ड्रॉ काढून विजेत्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांसाठी मनोरंजक खेळाचे आयोजन करून विजेत्या महिलांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाला ज्यांना येणे शक्य झाले नाही त्यांना कार्यक्रम पाहता यावे यासाठी थेट प्रक्षेपण युट्यूब वर आयोजकांनी केले होते...
या 'ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव' तर्फे आयोजित 'गौरव नारी कर्तृत्वाचा' याकार्यक्रमाला व्यासपीठावर झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दिलीप भोईर, सातिर्जे सरपंच प्राजक्ता खडपे, सामाजिक कार्यकर्त्या हिना वसीम कुर, माजी मापगाव ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्य विजय भगत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, अशोक नाईक, स.म.वडके विद्यालय चोंढी शाळेच्या माजी प्राध्यापक आशा श्रीकांत मोरे, व्याख्याती तपस्वी गोंधळी, संजीवनी नाईक, जागृती सावंत, मोहिनी सावंत, जान्हवी बारे, प्रेरणा गुळेकर, अनिता सोनावणे, स्वाती भगत, प्रतीक्षा वडे, रोहिणी मसूरकर, सानवी जाधव, संपदा दाबके, शिल्पा अनमाने, ज्योत्सना पाटील, रूपाली थळे, प्रभाकर मोहिते, अजित हरवडे, गितेश करळकर, सुभाष माने, अजित घरत, मनीष म्हात्रे, मजीद कुर, धोंडूनाना राऊत, राजेंद्र घरत, विश्वास थळे, मुदस्सर कुर, जगन्नाथ पाटील, सुनील अनमाने, सुधाकर मल्हार, जगदीश बारे, प्रमोद दळवी, सुमेश थळे, प्रशांत सकरे, विजय सोनावणे, तेजस काठे, कैलास भगत, गोपीनाथ भगत, बळीराम मोरे, नरेश अनमाने, संजय सोनावणे, प्रकाश गुळेकर आदी मान्यवर व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : "ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगांव" तर्फे मूनवली येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने 'गौरव नारी कर्तृत्वाचा' कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व महिलावर्ग,

