महाराष्ट्र वेदभुमी

रोहयाचा १०७ वर्षीय मेहेंदळे हायस्कूल शाळा अभियानात द्वितीय


रोहा, दि. ११ मार्च, प्रतिनिधी ;- 

रोहा तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे आणि हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे रोहयाचे मेहेंदळे हायस्कूलने यंदा १०७ वर्षात प्रदार्पण केले आहे. या हायस्कूलने मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात द्वितीय क्रमांक पटकाविल्याने शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शाळेचे आजीमाजी विद्यार्थी गुरुजनांचे अभिनंदन करीत आहेत...

मेहेंदळे हायस्कूलने शासनाने ठेवलेल्या ३० निकषापैकी सर्वच निकषे पूर्ण केली.या शाळेची भव्य ईमारत, हिरवीगार पारसबाग, परिसर व वर्ग स्वच्छता, थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय, डिजिटल वर्ग खोल्या, क्रीडा खेळांची प्रशस्त मैदाने, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्काऊट गाईड, आरएसपी इत्यादी बाबींचे परीक्षकांनी कौतुक केले. त्याचबरोबर विविध विषयांच्या स्पर्धा, शैक्षणिक सहल, स्वच्छता व अंधश्रद्धा विषयक शिबिरे आणि प्रभातफेऱ्या, विज्ञान प्रदर्शने, विज्ञान गणित दिन, शिष्यवृत्ती परीक्षा अशाप्रकारच्या राबविण्यात आलेल्या अनेक नाविन्यपूर्वक उपक्रमांची तपासणी केली...

 या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सुबक रांगोळ्या, वर्गसजावट या गोष्टी खास आकर्षित ठरल्या.या अभियानामध्ये सहभागी झालेले शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीमुळेच कोएसो मेहेंदळे हायस्कूलला यश मिळाले आहे. हे यश प्राप्त केल्यामुळे कोएसॊचे संचालक ऍड. हेमंत गांगल, मेहेंदळे हायस्कूलचे चेअरमन संदीप गांगल, प्राचार्य रमेश मोसे आणि शिक्षक वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post