महाराष्ट्र वेदभुमी

सुंदर वेलनेस योग प्रशिक्षण केंद्राची यशस्वीरित्या ५ वर्ष पूर्ण.



अलिबाग (ओमकार नागावकर) : 

अलिबाग मधील सुंदर वेलनेस योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षक सायली वैद्य आणि कल्पेश वैद्य हे गेल्या ५ वर्षांपासून योग प्रशिक्षण देत आहेत...त्यामुळे अनेकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी झाले आहे... शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे...भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते...सुंदर वेलनेस योग प्रशिक्षण केंद्राची स्थापना ३ मार्च २०१९ मध्ये करण्यात आली...त्या अनुषंगाने शनिवार दि.२ मार्च रोजी प्रशिक्षण केंद्राचा वर्धापन दिन हिराकोट तलावाजवळील वनविभागाच्या मैदानात साजरा करण्यात आला...

   योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उभ्या,बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन,  भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन,  मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले जातात... त्यामुळे अनेक साधक गेले ५ वर्षापासून केंद्राशी जोडले गेले आहेत... तर केंद्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात... रिट्रीट, क्रिया कार्यशाळा, गरोदरपणातील योग, प्रजनन योग, असे अनेक प्रकार योगा केंद्रात घेतले जातात...योग वर्गाचे प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपात ही घेतले असून भारता बाहेरील अनेक साधक देखील योग वर्गाशी जोडले गेले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post