अलिबाग (ओमकार नागावकर) :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल ग्रुप ग्रामपंचायतीला आय.एस.ओ (ISO) मानांकन मिळाल्यामुळे चौल ग्रामपंचायतीचे नाव सुवर्ण अक्षरांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी लिहिण्यात आले...आय.एस.ओ (ISO 9001) लिड ऑडिटर किरण भगत यांच्या हस्ते हे मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे...
यावेळी शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, विधान परिषद आमदार जयंत पाटील, शे.का.प जिल्हा चिटणीस अस्वाद पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, शिवसेना जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, शिवसेना युवासेना जिल्हा अधिकारी अमिर ठाकूर, नागाव ग्रामपंचायत सरपंचा हर्षदा निखिल मयेकर, चौल ग्रामपंचायत सरपंचा प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, ग्रामसेविका ऋतिका पाटील व सर्व चौल ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते...
शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे...ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉम्स, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे...बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मित करण्यात येत आहेत...स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकरण करण्यात येत आहे...
चौल ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई करणे, गावात व्यायमशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभेत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात आले, तर ग्रामपंचायतीचे सर्व नियम रितसर असल्यामुळे चौल ग्रामपंचायतीत आयएसओ मानांकन देवून मानाचा तुरा रोवला गेला. चौल ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकास कामाचा कायम पाठपुरावा माजी रा.जी.प विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी करून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे... त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळालेल्या आय.एस.ओ मानांकनाचे श्रेय श्री.म्हात्रे यांना भाषणाच्या वेळी देण्यात आले...
