महाराष्ट्र वेदभुमी

अलिबाग वडखळ मार्गावर सफेद कांद्या व विविध खाद्यपदार्थास पर्यटकांची मागणी,


सोगाव ,अलिबाग अब्दुल सोगवकर 

ग्रामीण भागात आदिवासी,कोळी व इतर महिलांना रोजगार संधी उपलब्ध

रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक मोठ्या आवडीने अलिबागच्या सफेद कांद्याची माळ घेऊन जात असताना नेहमीच आढळतात... अत्यंत औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या सफेद कांद्याला नुकतेच विशेष आयएसओ प्राप्त झाले आहे...

      मुख्यत्वे अलिबाग- मुरुडकडे आलेले पर्यटक परतीला अलिबाग वडखळ मार्गाने मुंबई पुण्याकडे निघताना या भागातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे सफेद कांद्याची माळ, कलिंगड, आंबे, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे, वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती पापड, कुरुड्या, दह्याच्या मिरच्या, चिंचाचे गोळे, वाल व याठिकाणी होणारी इतर कडधान्ये, मच्छिप्रेमी असणारे विविध प्रकारची ओली मच्छी, सुखी मच्छी यामध्ये सुखा जवळा, बोबींल, वाकट्या, खाऱ्या, खारे बांगडे, विविध प्रकारची खारी मच्छी तसेच स्वादिष्ट चिक्की, नारळीपाक, कोकम सरबत आदी प्रमुख खाद्यपदार्थ प्रत्येक ऋतूत मोठ्या प्रमाणात आवर्जून खरेदी करून घेऊन जात असतात. हे पदार्थ घेण्यासाठी मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी वेळेची व पार्किंग समस्येमुळे अडचण येत असल्याने पर्यटक रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक आदिवासी महिला, कोळी महिला, स्थानिक महिला व पुरुष विकायला बसतात, त्यांच्याकडून खरेदी करून आपला वेळ व  पैसा वाचविण्यासाठी प्राधान्य देत आहेत...


          यामुळे स्थानिक विक्रेते मात्र कोणत्याही प्रकारचा दुकानाचा भाडे, लाईट बिल व इतर खर्च टाळून दोन पैसे खिशात येत असल्याने आनंदात असल्याचे दिसत आहे...

फोटो लाईन :अलिबाग वडखळ मार्गालगत सफेद कांद्याच्या माळी व विविध प्रकारच्या स्थानिक वस्तू विकताना विक्रेते,


Post a Comment

Previous Post Next Post