रोहा, दि. १६ फेब्रु. प्रतिनिधी
रोहा -अष्टमी शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण खा. सुनिल तटकरे यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले, अयोध्येत नुकतेच श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या पाश्वभूमीवर रोहयात श्री हनुमान मंदिराच्या भूमिपूजनासाठी आलेल्या खा. सुनिल तटकरें यांची शहरातील तीनबत्ती नाका ते श्रीराम मंदिर दरम्यान रथातून मिरवणूक काढण्यात आली... या एक पत्नी, एक वचनी, एक बानी असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोरील श्री हनुमान मंदिराचे भूमिपूजन यावेळी संपन्न झाले...
रोहा नगरपरिषदे कडून अष्टमी येथे व्यायाम शाळा अद्यावत व्यायाम शाळा तयार करणे या कामाचे भूमिपूजन, कै. द. ग. तटकरे ब्लड बँक व शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीचे लोकार्पण केल्यानंतर श्री हनुमान मंदिर नूतनीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी तटकरे रोहा येथे आले होते, यावेळी मंत्री अदिती तटकरे, आम. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजयराव मोरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा पंकज भुसे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मारुतीमंदिर ट्रस्टचे विश्वस्त आनंद कुळकर्णी, मोतीलाल जैन, अरविंद करंबे, मकरंद बारटक्के, प्रदीप तथा आप्पा देशमुख, सुभास राजे आदी मान्यवर उपस्थित होते...
यावेळी बोलताना खा. तटकरे म्हणाले कि आगामी काळात रोह्यात अध्ययवत पद्धतीचे मल्टीप्लस हॉस्पिटल उभारण्यात येईल, लोकार्पण केलेल्या ब्लड बँकेत अपर्णा फाऊंडेशन डी. वाय पाटील हॉस्पिटल येथील ब्लड बँकला आपण चालवायला दिले आहे. याव्यतिरिक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोहा बस स्थानक, मेडिकल कॉलेज, ५०० खाट्टांचे रुग्णालय, वरसे येथे महिलांसाठी जिल्हा रुग्णालय डॉ.सी. डी.देशमुख डायवरसिटी पार्क, आदींसह येत्या काही दिवसांत हनुमान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात येईल... पुढील वर्षी हनुमान जयंती अगोदर मंदिर उभे राहील. येत्या तीन महिन्यांमध्ये अत्याधुनिक नाट्यगृह लोकार्पण केले जाईल... यावेळी प्रास्ताविक मकरंद बारटक्के यांनी तर सूत्रसंचलन प्रतीक राक्षे यांनी केले...
