महाराष्ट्र वेदभुमी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन !


उरण दि २७(विठ्ठल ममताबादे)

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पद स्विकारल्या पासून काँग्रेस पक्षामधे नवचैतन्य निर्माण झाले आहे... तरुण कार्यकर्ते काँग्रेसमधे सक्रीय झाले आहेत... महेंद्र महादेव पाटील यांची खोपटा गाव काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी तर अलंकार मनोहर पाटील यांची खोपटा गाव युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली...

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नियुक्ती पत्र देवून त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या... याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केशव घरत तसेच खोपट्याचे उप सरपंच सुजित म्हात्रे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post