सोगाव अलिबाग:अब्दुल सोगावकार
मुशेत येथील हजरत कादिर अली शाह बाबांच्या दर्ग्याचा उरूस शनिवार दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला... या उरुसात मुशेत पंचक्रोशीतील अनेक हिंदू मुस्लिम समाजातील अनेक मान्यवरांनी व लहान मुले, महिला तसेच पुरुष बांधवांनी उपस्थित राहून दर्शन घेतले...
दर्ग्याच्या उरुसानिमित्त संध्याकाळी संदल कार्यक्रमानंतर ग्यारवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते... यावेळी दिवसभर पंचक्रोशीतील अनेक हिंदू मुस्लिम बांधवांनी बाबांच्या मझारीवर चादर चढवत दर्शन घेतले... या कार्यक्रमाला दरवर्षी न चुकता आवर्जून उपस्थित असणारे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी चादर चढवून दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे चाहते नदीम अत्तार, आसिफ मलिक, मुन्ना टर्नर, शफी भाई सय्यद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते... सर्व मान्यवरांचे दर्गा कमिटी व मुशेत ग्रामस्थांनी स्वागत केले... उरूस निमित्ताने मुशेत ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला होता...
फोटो लाईन : मुशेत येथील उरुसानिमित्त दर्ग्यात चादर चढवतांना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ,