शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: दि:२७ फेब्रुवारी रोजी एन इ एस उर्दू हायस्कूल खैरे खुर्द येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला...
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली, खैरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे पालक आदरणीय अकबर धनसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले, संस्थेचे अध्यक्ष एजाज हसन धनसे, सेक्रेटरी जाकीर खोत, सल्लागार अब्दुल कादिर पित्तू व सदस्य फैसल गीते इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते...
मान्यवरांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहित केलं व आपल्या भाषणातून उत्तम मार्गदर्शन केले...
सहाय्यक शिक्षिका रश्मीन मॅडम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सदुपयोग करावा आणि दूरउपयोग करू नये, तुमच्या शिक्षणाचा मानव जातीला फायदा होईल असे वागावे कोणाचे नुकसान करू नये आशे मार्गदर्शन केले... मौलाना रझाउल्ला अझमी यानी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपले विचार आपले आचरण व आपले वागणे शुद्ध स्वरूपाचे असावे, आपला सांस्कृतिक वारसा जपावा व चांगले नागरिक बना, तसेच सहाय्यक शिक्षक अनवर सरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा मंत्र दिला...
मुख्याध्यापिका सौ सुमय्या मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की टेक्नॉलॉजी ही मनुष्य जातीचा वेळ वाचवण्यासाठी आली आहे परंतु आज मनुष्य टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन वेळ वाया करत आहे तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा सदुपयोग करावा आपला वेळ वाचवा, संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय जाकीर खोत साहेब यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आश्वासन दिले की आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत तसेच त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत सांगितले की तुम्ही एक चांगली पिढी घडवत आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे, तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय एजाज धनसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यावी त्यांना जपावे कारण आई-वडिलांनी तुमच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या वर्तमानाची आहुती दिलेली असते, तुमचे सुगीचे दिवस आल्यानंतर त्यांना विसरू नका त्यांची काळजी घ्या. तसेच सर्वांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी व पुढील आयुष्यासाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. सोमय्या मुल्ला यांनी आभार प्रकट केले व कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता झाली...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षिका अरबीना, मॅडम सारा मॅडम, सायमा मॅडम, मैमुना मॅडम,रश्मीन मॅडम,अंवर सर इत्यादी सर्वांचाच मोलाचा वाटा होता...


