कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील तसेच आध्यात्मिक तथा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे श्री शंकर महादेव नुतन मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा मिती माघ कृ. पंचमी शके १९४५ गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून सदरच्या सोहळ्या प्रसंगी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या सोहळ्यानिमित्ताने ग्रामस्थ महीला तसेच युवक मंडळ यांच्या वतीने विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत...
कोकण विकासाचे शिलेदार रायगडाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे,ना.अदितीताई तटकरे,आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष निधीतून तसेच चिल्हे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून नव्याने बांधण्यात आलेल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोहळा व मंदिर जीर्णोद्धार नवीन मूर्तींचे प्राण प्रतिष्ठा सोहळा गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे....
मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात या मंदिराचे जिर्णोद्धार तसेच श्री शिव शंकर महादेव लिंग,श्री गणेश ,विष्णू,माता पार्वती, नंदी,सह रक्षक इत्यादी मूर्तींची नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या अनुषंगाने बुधवार आणि गुरुवार दोन दिवस विधिवत पद्धतीने या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असून गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी स्थापित पीठदेवता पूजन व मूर्तीना विधीवत अभिषेक तद्नंतर ज्ञानभास्कर श्री ष. ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज (वाई- सातारा) व महंत ह.भ. प. सुदर्शन महाराज शास्त्री कारखेले(पाथर्डी- बीड) यांच्या शुभ हस्ते मूर्तींना प्राणमंत्र व कलशावरोहण. पौरोहीत्य :- मा.मू.लक्ष्मणस्वामी जंगम, रुपेशस्वामी जंगम,(लांढर) आणि गजाननस्वामी जंगम (चिल्हे ) यांच्या मंगलमय मंत्र घोषणे होणार आहे...
भव्य दिव्य आणि सुसज्ज बांधण्यात आलेल्या या मंदिराचा लोकार्पण सोहळा रायगडाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमूख उपस्थीत तसेच ना. अदिती तटकरे,आ.अनिकेत भाई तटकरे,यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून गावातील जल जीवन नळ पाणी योजना,प्राथमिक शाळा चिल्हेच्या नूतनीकरण वर्गाचे,व्यायाम शाळा तसेच अंतर्गत काँक्रिटकरण रस्त्याचे व विविध प्रकारच्या विकास कामांचे शुभारंभ खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होत आहे...
सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील विकास कामांचे लोकार्पण सोहळा तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून या प्रसंगी सायं ४ ते ५ या वेळेत रायगड भूषण तथा खांब पंचक्रोशीचे वैभव हभप मारुती महाराज कोल्हटकर यांचे सुश्राव्य प्रवचन,५ ते ६ खांब पंचक्रोशीतील संपुर्ण हरिपाठ, महाप्रसाद तसेच रात्रौ ९ ते ११ या वेळेत मराठी तडखा झी टॉकीज फेम महंत ह.भ. प. सुदर्शन महाराज शास्त्री कारखेले (पाथर्डी- बीड) यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न होणार असून यासाठी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिल्हे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे...तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिल्हे ग्रामस्थ,महीला मंडळ व युवक मंडळ अधिक परिश्रम घेत आहेत...