अब्दुल सोगावकर अलिबाग
सोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणाऱ्या अलिबाग तालुक्यातील नामांकित सामाजिक संस्था दी लाईफ फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले...
या स्वच्छता अभियान कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आबेडकर समाजकार्य विद्यालय,धुळे विद्यालयाचे ४० विद्यार्थी व प्राध्यापक डॉ. राजेन्द्र बैसाने आणि डॉ. रघुनाथ महाजन आणि प्रा. आम्रपाली सूर्यवंशी आणि दी लाईफ फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ, राखी राणे, इत्यादींनी मेहनत घेऊन समुद्र किनारा प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त केला तसेच प्लास्टिक मुक्त पर्यावरण निर्मितीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी ९ गोणी प्लास्टिक कचरा व ३ गोणी काचेच्या बाटल्या गोळा करून अलिबाग नगरपालिकेच्या कचरा घंटागाडी मध्ये व्हिलेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या. यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांनी उपस्थित पर्यटकांना कचरा न करण्याचे आवाहन करत कचरा पेटीमध्ये टाकण्याची विनंती करण्यात आली...
फोटो लाईन :अलिबाग समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात सहभागी उपस्थित विद्यार्थी व दी लाईफ फाउंडेशन चे कार्यकर्ते तसेच मान्यवर,


