अब्दुल सोगावकर :अलिबाग
सोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील ताडाचीवाडी आदिवासीवाडी येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी दी लाईफ फाऊंडेशन द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यालय, धुळे येथील बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने सामाजिक सुधारणा बाबतीत शिक्षणाचे महत्त्व , व्यसनाचे दुष्परिणाम, आणि स्वच्छ्ता व्यवस्थापन (ओला कचरा सुका कचरा) आदी विषयांबाबतीत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. आदिवासी बांधव दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात आणि संध्याकाळी घरी परत येतात या गोष्टीचा विचार करून हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता...
या कार्यक्रमाला धुळे विद्यालयाचे ४० विद्यार्थी व प्राध्यापक प्रा.डॉ.राजेंद्र बैसाणे, प्रा.डॉ.रघुनाथ महाजन आणि प्रा. आम्रपाली सूर्यवंशी यांच्यासह दी लाईफ फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ, राखी राणे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे क्रांती पाटील हे उपस्थित होते...
सामाजिक विकास, ग्रामीण विकास व आदिवासी विकास याबाबतीत सामाजिक संस्था काय कार्य करतात? भविष्यात सामाजिक कार्य करण्यासाठी कोणकोणत्या समस्या उद्भवतात ? व त्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संस्था कश्या पद्धतीने काम करतात, यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा करून घेत संस्थांना भेटी देत आहोत, रायगड जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून हा समाज शिक्षणापासून वंचित आहेत, याची कारणे जरी वेगवेगळी असली तरी या समाजाने आपला विकास साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात येणे खूप महत्त्वाचे आहे, आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाकडे वळवावे, असे विद्यार्थ्यांनी आवाहन करत लाईफ फाउंडेशन संस्था खूपच चांगले कौतुकास्पद कार्य करते आहे, आपण या संस्थांना साथ देणे गरजेचे असल्याचे शेवटी सांगितले...
फोटो लाईन: दी लाईफ फाउंडेशन द्वारे ताडाचीवाडी आदिवासीवाडी येथे धुळे येथील विद्यार्थी जनजागृती करताना सोबत मान्यवर,

