शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातच बैलगाडी शर्यतीसाठी सरकार कडून परवानगी देण्यात आली होती... त्यावेळेस बैलगाडी शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण होते... त्यातच रायगड जिल्हा बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी यांनी अलिबाग तालुक्यातील चौल येथे झालेल्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेट देवून जिल्हा बैलगाडी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बैलगाडी भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला..
यावेळी अलिबाग शिवसेना विधानसभा संघटक तसेच माजी जिल्हाध्यक्ष बैलगाडी संघटना रायगड कृष्णा कडवे, शिवसेना प्रवक्ते धनंजय गुरव, जिल्हाध्यक्ष बैलगाडी संघटना रायगड अजय म्हात्रे, (सारळ पुल ते रेवदंडा किनारा अध्यक्ष) दिलीप राऊत, वावे विभाग अध्यक्ष अनिल तुरे, माजी अध्यक्ष वावे परशुराम पाटील यावेळी उपस्थित होते...
