उरण दि १० (विठ्ठल ममताबादे)
उरण तालुका हे रायगडमधील साहित्य चळवळीच्या उपक्रमांचे केंद्र असल्याप्रमाणे साहित्याच्या विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात... उरण तालुक्यात उरण शहरातील विमला तलाव (गार्डन )येथे दर महिन्याच्या १७ तारखेला कवी संमेलन मोठया उत्साहात संपन्न होते...या चालू महिन्यात म्हणजेच १७ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी १०० वे कवी संमेलन एस.एस.पाटील इंटरनॅशनल स्कूल,फुंडे, उरण येथे भव्य बक्षिसांच्या, काव्यस्पर्धेच्या रूपात संपन्न होणार आहे... महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या १०२ कवींमधून २० कवींना जवळजवळ एक लाखांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत... ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून राज्यस्तरीय खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकांचे बक्षीस २५००० रुपयांचे आहे... या संमेलनाचे अध्यक्ष रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील असून कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे या संमेलनाला आशीर्वाद आहेत... संस्थेचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिताताई कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदिप ढवळ,रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे...
उरणला विमला तलावावर मागील ८ वर्षे ३ महिने ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कवी संमेलने पार पडली आहेत.एकूण ९९ कवी संमेलन पार पडली असून १७ फेब्रुवारी २०२४ रोजी १०० वे राज्यस्तरीय कवी संमेलन उरण तालुक्यात मोठया उत्साहात संपन्न होणार आहे...आजपर्यंत संपन्न झालेल्या प्रत्येक कवी संमेलना मध्ये दोन नागरिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे...१०० व्या आयोजित संमेलनात उरण तालुक्यातील प्राचार्य शामा सर, प्राचार्य प्रल्हाद पवार , प्राचार्य एल. एम.भोये, चित्रकार प्रकाश पाटील,मिसेस महाराष्ट्र श्वेता राजकुमार, जलतरणपटू मयंक म्हात्रे ,फिल्म मेकर तेजस पाटील ,ह.भ.प.भालचंद्र म्हात्रे महाराज यांना गौरविण्यात येणार आहे...पारितोषिक वितरणाला ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्रचे अध्यक्ष गणेश कोळी,संजय गुंजाळ, मिलिंद खारपाटील, सुनिता जोशी, साहेबराव ठाणगे,ए.डी पाटील, ईशान संगमनेरकर इ.ची प्रमुख उपस्थिती राहणार आहे...
उरण कोमसाप अध्यक्ष श्री.मच्छिंद्र म्हात्रे त्याच प्रमाणे मधुबन कट्टा प्रभारी अध्यक्ष श्री. रामचंद्र म्हात्रे ,सौ.रंजना केणी, श्री.अजय शिवकर, श्री.संजय होळकर, श्रीम.समता ठाकूर, श्री.किशोर पाटील, श्री.भरत पाटील, श्री अनिल भोईर, श्री.रमण पंडीत इत्यादी कार्यकारिणी सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत...
पद्मश्री मधुभाईंनी कोमसापच्या रूपात साहित्य क्षेत्राची असामान्य सेवा केली आहे...याच सेवेचा विचार करून रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील आणि मधुबन कट्ट्याचे माजी अध्यक्ष अर्जुन हंडोरे यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कोमसाप उरण शाखेच्या मधुबन कट्टयाची स्थापना झाली. तेव्हा पासून ते आजतागायत अंखडपणे दर महिन्याच्या १७ तारखेला मधुबन कट्टा विमला तलाव उरण येथे कवी संमेलन संपन्न होत असते. भविष्यात हा काव्यानंद देण्याचा मानस असाच चालत राहणार आहे. या काव्यानंदा सोबत मधुबन कट्ट्यावर अनेक निमंत्रित कवीचा सन्मान देखील केला जातो... उरण येतील उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या जेष्ठ मंडळींना कवी संमेलन मध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान देखील केला जातो...दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी कवी संमेलन प्रवासाला १०० महिने पूर्ण होत आहेत. म्हणूनच या १०० व्या कवी संमेलन निमित्त राज्यस्तरीय भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे...तसेच मधुबन कट्टा गौरव दिन, वाङमयीन पुरस्कार प्रदान आणि मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन देखील केले आहे.तरी जेष्ठ साहित्यिक, कवी, लेखक, साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर, रसिक प्रेषक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे...

