शहानवाज मुकादम/रोहा
मो.7972420502,(७९७२४२०५०२)
आज बुधवार दिनांक ७/०२/२०२४ न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयात शासकीय चित्रकला- एलिमेंटरी व इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अभिनंदन गुणगौरव सोहळा पार पडला...
इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा निकाल=१००%.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा निकाल= ९२.३०%.
याप्रसंगी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक एस के जोंधळे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- महेंद्र चिपळूणकर, खांबेरे पोलीस पाटील अभिजित भोईर,सामाजिक कार्यकर्त्या चणेरा गावच्या सौ.सारिका प्रसन्ना सिनकर मॅडम व रमेश चिपळूणकर या मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन कौतुक व अभिनंदन करण्यात आले...तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचाही या सन्मान करण्यात आला...
सदर कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय मुख्याध्यापक जोंधळे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले...
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजबळ सर यांनी केले... व शेवटी टारपे सर यांनी सर्वांचे आभार मानले...
