महाराष्ट्र वेदभुमी

अवघडलेल्या गरोदर महिलेला लोकल ट्रेनमध्येच प्रसुतिकला निकिता शेवेकर यांनी केली सुटका. कोकण युवा सेवा संस्थाकडून अभिमानास्पद कामगिरीबद्दल सन्मान


उरण ८ फेब्रुवारी (अजय शिवकर) 

आज-काल धावपळीच्या युगात प्रत्येकाचे आयुष्य गतिमान झाल आहे...पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलासुद्धा सर्वत्र कार्यरत आहेत, अशात महिलाच नाही तर पुरुषांना सुद्धा कितीतरी अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागते, अशावेळी गरज असते खंबीरपणे खऱ्या माणुसकीची......आणि ती दाखविणारा खरतर संकटाच्यावेळी देव असतो... 

बुधवार दिनांक ७/२/२०२४ रोजी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यावेळी वेळेचं अवधान राखून त्याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेनं माणुसकी दाखवून तेथेच त्या महिलेची प्रसूती करून सुटका केली...

तीच्या या कार्याची दखल घेवून कोकण युवा सेवा संस्थेचे उरण तालुका संघटक श्री परेश म्हात्रे यांनी कॉल करून माहिती दिली की ज्या महिलेने डिलिव्हरी केली ती महिला उरणची रहिवासी आहे... मग संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष - मा.अभि कोटकर, सचिव - श्री.तृशांत पवार, उपसचिव - श्री.अनिल गावडे, व खजिनदार - सौ.संजना बेंद्रे, यांच्या मार्गदर्शनाने उरण तालुका संघटक - मा.परेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरणच्या रहिवाशी सौ. निकिता देवेंद्र शेवेकर यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल साडी, शाल , श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.... त्यावेळी कोकण युवा सेवा संस्थेचे उरण तालुका संघटक- मा.परेश म्हात्रे यांच्यासह संस्था सदस्य - सौ.स्वप्नाली पाटील, सौ.आरती फुलदाणी,श्री.राहुल कोशे, श्री.मनोज सोनकर,श्री.महेश कोळी,श्री.कुंदन फुलदाणी, ॲड. सौ.पुर्वी कोशे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post